बोरी चंद्रशेखर,
pledge to plant trees जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनावर सुरू करण्यात आलेल्या ‘एक झाड मां के नाम’ या अभियानांतर्गत भारतीय जनता पार्टीच्या वतीने बोरी परिसरातील पांधुर्णा येथे वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
pledge to plant trees हे अभियान 15 जूनपर्यंत राबविण्यात येणार असून त्या अंतर्गत परिसरातील सर्व 40 बुथांवर एकूण 1000 झाडे लावण्याचा संकल्प करण्यात आला आहे. या उपक्रमात केवळ वृक्षारोपणच नव्हे तर लावलेल्या झाडांचे संगोपन व संवर्धन करण्याची जबाबदारीही समाविष्ट आहे. पर्यावरण संरक्षण आणि हरित विकासासाठी हा उपक्रम अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. यावेळी भाजपाचे जिल्हा मुख्यालय प्रभारी शंतनू शेटे, जिल्हा किसान मोर्चा प्रमुख पंजाब जाधव, मंडळ अध्यक्ष राजेंद्र चिरडे, उपाध्यक्ष अभि तिवारी, मनोज भाग्यवंत, पांधुर्णा आदर्शग्रामचे सरपंच रत्नदीप पवार, यादव पवार, मोहन ठाकरे, नरेश आडे, आकाश पवार, भाजपा पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.