तलावातील मातीची लूट

दुर्मिळ पक्षी आणि वन्यजीवांच्या अस्तित्वावर संकट

    दिनांक :07-Jun-2026
Total Views |
सेलू,
Plunder of soil from the lake तालुयातील नानबर्डी गावालगत असलेल्या डोंगरगाव तलावातून सुरू असलेल्या मातीच्या अवैध उपस्यामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडण्याची भीती व्यत होत आहे. जेसीबी, ट्रॅटर आणि इतर यंत्रसामग्रीच्या साहाय्याने मोठ्या प्रमाणावर तलावातील गाळ आणि माती उपसली जात असल्याने तलाव परिसरातील जैवविविधतेला गंभीर धोका निर्माण झाला आहे.
 
 
Plunder of soil from the lake
 
तलावाच्या तळातील गाळासोबतच टेकडीच्या पायथ्याशी असलेली मातीदेखील काढली जात असल्याने परिसरात मोठमोठे खड्डे पडले आहेत. यामुळे नैसर्गिक अधिवास उद्ध्वस्त होत असून पर्यावरणीय हानी वाढत आहे. विशेष म्हणजे, हा तलाव तीन बाजूंनी घनदाट जंगलाने वेढलेला असल्याने वन्यजीव आणि पक्ष्यांसाठी महत्त्वाचा आश्रयस्थान म्हणून ओळखला जातो. या परिसरात बोर व्याघ्र प्रकल्पाचा बफर झोन असून हरण, रानडुकर, मोर यांसह अनेक वन्यजीव पाण्यासाठी या तलावावर अवलंबून आहेत. मात्र, अवैध उत्खननासाठी दिवसरात्र सुरू असलेल्या वाहनांच्या वर्दळीमुळे वन्यजीवांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. परिणामी, अनेक प्राणी तलावाकडे येणे टाळत असल्याचे नागरिकांकडून सांगितले जात आहे.
 
 
या तलाव परिसरात शंभरहून अधिक पक्षी प्रजातींचे वास्तव्य आहे. त्यामध्ये नदी सुरय, मोहोळ, भारतीय करकोचा, टिटवी, पांढर्‍या छातीचा खंड्या तसेच इतर अनेक दुर्मिळ व स्थलांतरित पक्ष्यांचा समावेश आहे. तलावाच्या काठावरील सपाट जमिनीवर हे पक्षी दरवर्षी घरटी बांधून प्रजनन करतात. मात्र, माती उपस्यामुळे त्यांच्या सुरक्षित अधिवासाचा र्‍हास होत असून प्रजनन प्रक्रियेवरही परिणाम होण्याची शयता आहे.
 
 
परिसरातील नागरिकांनी या प्रकाराविरोधात नाराजी व्यत केली असून वनविभाग आणि महसूल प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून अवैध उत्खनन थांबवावे, अशी मागणी केली आहे. अन्यथा, पर्यावरणीय हानीसोबतच वन्यजीव आणि दुर्मिळ पक्ष्यांच्या अस्तित्वावर गंभीर संकट ओढवू शकते, असा इशारा पर्यावरणप्रेमींनी दिला आहे. पर्यावरण संवर्धनासाठी महत्त्वपूर्ण मानल्या जाणार्‍या या तलावाचे संरक्षण करण्यासाठी संबंधित विभागांनी त्वरित कारवाई करणे आवश्यक असल्याचे मत व्यत होत आहे.