मुंबई
Saloon services जागतिक अस्थिरतेमुळे वाहतूक खर्च, सौंदर्यप्रसाधने, सलून साहित्य आणि कामगारांचे पगार वाढल्याने राज्य सलून असोसिएशनने सेवा दरांमध्ये २० टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे केस कापण्यासाठी जर 100 रुपये दर असतील तर त्याजागी आता १२० रुपये तर दाढीसाठी ८० च्या जागी १०० रुपये मोजावे लागतील. राज्यात अनेक ठिकाणी रविवारपासूनच ही दरवाढ लागू झाली आहे. अचानक झालेल्या या दरवाढीमुळे ग्राहकांच्या खिशाला कात्री लागणार असली तरी बदलत्या आर्थिक परिस्थितीमुळे नागरिकांनी सहकार्य करावे अशी अपेक्षा सलून व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे.

Saloon services सलून व्यवसायासाठी आवश्यक असलेल्या कॉस्मेटिक वस्तू, इंधन, वीजबिल, दुकानांचे भाडे तसेच कर्मचाèयांच्या वेतनामध्ये झालेली वाढ यामुळे सलून चालकांवर आर्थिक ताण वाढला आहे. तसेच वाढती महागाई, सलूनमध्ये वापरल्या जाणाèया साहित्याच्या वाढलेल्या किंमती, वीजबिल, दुकानभाडे आणि कर्जावरील वाढते हप्ते यामुळे व्यवसाय चालवणे कठीण झाल्याचे महामंडळाने म्हटले आहे. त्यामुळे दरवाढीचा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आलं. दरम्यान या दरवाढीमुळे आता केस कापणे, दाढी करणे, हेअर कलर, फेशियल आणि इतर सर्व प्रकारच्या सेवांसाठी अधिकचे पैसे मोजावे लागतील.
Saloon services प्रीमियम सलून दुकान
दाढी- 200 ते 500 रुपये
कटिंग- 500 ते 1000 रुपये
हेअर कलर - 700 ते 1000 रुपये
फेशियल - 2000 ते 3000 रुपये
हेअर ट्रिटमेंट- 3000 ते 5000
मेकअप (ब्रायडल)- 7000 ते 10000 रुपये
मेकअप (ग्रुम) - 2000 ते 4000 रुपये
Saloon services एसी सलून दुकानमधील दर
दाढी - 100 ते 200 रुपये
कटिंग- 150 ते 350 रुपये
हेअर कलर - 300 ते 500 रुपये
फेशियल - 500 ते 1500 रुपये
हेअर ट्रिटमेंट - 1500 ते 3000 रुपये
मेकअप (ब्रायडल) - 3000 ते 7000 रुपये
मेकअप (ग्रुम) 1000 ते 3000 रुपये
Saloon services ग्रामीण भागातील सलूनचे दर
दाढी - 50 ते 70 रुपये
कटिंग - 80 ते 100 रुपये
हेअर कलर- 80 ते 100 रुपये
फेशियल- 200 ते 500 रुपये
हेअर ट्रिटमेंट- 200 ते 500
मेकअप (ब्रायडल)- 1500 ते 3000 रुपये
मेकअप (ग्रुम) - 500 ते 1500 रुपये