श्यामनाथ घिरटकर भारतीय सैन्यात

    दिनांक :07-Jun-2026
Total Views |
तर वैभव टारफे महाराष्ट्र पोलिस दलात

हदगाव, 
successful tradition of Palasa village हदगाव तालुक्यातील पळसा हे गाव भारतीय सैन्य व पोलिस दलात युवकांची निवड होण्यासाठी ओळखले जाते. ग्रामदैवत श्री बिरोबा महाराज यांची पावनभूमी म्हणून प्रसिद्ध असलेल्या या गावाने पुन्हा एकदा यशाची परंपरा कायम राखली आहे. पळसा येथील श्यामनाथ पांडुरंग घिरटकर यांची भारतीय सैन्यात, तर वैभव दिगांबर टारफे यांची महाराष्ट्र पोलिस दलात निवड झाल्याने संपूर्ण गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून गावकरी, नातेवाईक, मित्रपरिवार व परिसरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
 
 
ARM
 
हदगाव तालुक्यात सर्वाधिक म्हणजेच तीसहून अधिक युवक भारतीय सैन्यात कार्यरत असल्याचा गौरव पळसा गावाला लाभला आहे. त्यामुळे गावातील युवकांमध्ये देशसेवेची प्रेरणा कायम दिसून येते. काही वर्षांपासून पळसा येथे संदीप सुभाष राठोड यांनी शेतकरी व शेतमजूर कुटुंबातील युवकांना योग्य दिशा मिळावी, त्यांनी व्यसनांपासून दूर राहून मेहनतीच्या बळावर प्रगती साधावी आणि स्वतःसह कुटुंब व गावाचे नाव उज्ज्वल करावे या हेतूने यशवर्धिनी करिअर अकॅडमी सुरू केली आहे. या अकॅडमीमध्ये अनेक युवक विविध स्पर्धा परीक्षा, सैन्य भरती व पोलिस भरतीसाठी नियमित सराव करतात. प्रशिक्षक ब्रम्हा वाणी यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक तरुणांनी भारतीय सैन्य तसेच महाराष्ट्र पोलिस दलात यश संपादन केले आहे.
 
 
 
successful tradition of Palasa village याच यशस्वी परंपरेचा पुढील अध्याय म्हणून एका आठवड्यातच दोन युवकांनी मोठे यश मिळविले आहे. त्यामध्ये श्यामनाथ घिरटकर यांची भारतीय सैनिक म्हणून तर वैभव टारफे यांची राज्य पोलिस दलात निवड झाली आहे. या दोघांच्या निवडीची माहिती गावात पोहोचताच ग्रामस्थ, युवक व मित्रपरिवाराने आनंदोत्सव साजरा केला. निवड झालेल्या युवकांची त्यांच्या आई-वडिलांसह गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. ढोल-ताशांच्या गजरात, फटाक्यांची आतषबाजी करत आणि घोषणांनी परिसर दणाणून सोडत दोघांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. श्यामनाथ घिरटकर व वैभव टारफे यांच्या यशामुळे गावातील इतर युवकांनाही प्रेरणा मिळाली असून मेहनत, चिकाटी आणि योग्य मार्गदर्शनाच्या जोरावर कोणतेही ध्येय गाठता येते, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. या उल्लेखनीय यशाबद्दल यशवर्धिनी करिअर अ‍ॅकेडमीचे संदीप राठोड, प्रशिक्षक ब्रह्मा वाणी, ग्रामस्थ, युवक आणि परिसरातील नागरिक त्यांचे अभिनंदन करत आहेत.