जलतरण स्पर्धेत श्रावी सार्वे प्रथम

    दिनांक :07-Jun-2026
Total Views |
‘प्रेसिडेंट कप’ जिल्हास्तरीय स्पर्धा

भंडारा, 
Swimming competition अ‍ॅक्वाटीक असोसिएशन व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय भंडारा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जलतरण स्पर्धेत कु.श्रावी विकल सार्वे हिने पाच ते सात वर्षे वयोगटात प्रथम क्रमांक प्राप्त केला. आज रविवार, 7 जून रोजी छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकूल भंडारा येथील जलतरण तलावावर जिल्हास्तरीय भव्य ‘प्रेसिडेंट कप’ जलतरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
 
 
Swimming competition
 
Swimming competition  अ‍ॅक्वाटीक असोसिएशनचे अभय भागवत व किर्ती बिसेन यांच्या मार्गदर्शनात ही स्पर्धा पार पडली. स्पर्धेत 2 वर्षापासून ते 50 वर्षांपर्यंत आणि खुला गट अशा विविध वयोगटांसाठी 25 व 50 मीटर फ्री स्टाईल जलतरण प्रकारांचे आयोजन करण्यात आले. यामध्ये उत्कृष्ट प्रदर्शन करीत 25 मीटर फ्री स्टाईल प्रकारात कु.श्रावी विकल सार्वे हिने प्रथम क्रमांक पटकविला. तिला सुवर्ण पदक, प्रेसिडेंट कप व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. श्रावीचे वडील सुध्दा भारतीय सैन्यात खेळाडू असून सध्या उन्हाळ्याच्या सुट्यांमध्ये श्रावी आपल्या आजोबांकडे भंडारा येथे आली आहे. श्रावीने आपल्या यशाचे श्रेय आई-वडील व आजी आजोबांना दिले आहे.