*सुमन गिरी यांच्यातर्फे भोजाजी महाराज देवस्थानला वॉटर कुलर दान
आजनसरा,
Water cooler donated अधिकमासात केलेले दान हजारपटीने पुण्य मिळवून देते, या श्रद्धेने प्रेरित होऊन लेकीने वडिलांच्या स्मृतींना सेवेचे रूप दिले. नीळकंठ भारती यांच्या स्मृतीप्रित्यर्थ कन्या सुमन गिरी रा. गाडेगाव (कानगाव) यांनी संत भोजाजी महाराज देवस्थान येथे येणार्या भाविकांच्या सोयीसाठी वॉटर कुलर भेट दिला.
Water cooler donated सुमन गिरी यांच्या हस्ते मंत्रोच्चारात विधिवत पूजन करून व फित कापून वॉटर कुलरचे लोकार्पण करण्यात आले. बाबांच्या नावाने तहानलेल्यांची तहान भागेल, याहून मोठे पुण्य नाही, असे सुमन म्हणाल्या. याप्रसंगी पत्रकार राजीव गिरी, डॉ. संदीप लोंढे, गाडेगावचे माजी सरपंच मारोतराव राजूरकर, अविनाश गिरी, संजय गिरी, प्रशांत गिरी, त्र्यंबक तळवेकर यांच्यासह आदी उपस्थित होते. कडक उन्हात दर्शनासाठी येणार्या वारकरी, वृद्ध व लहान मुलांसाठी थंड पाण्याची ही सोय म्हणजे महाराजांचाच आशीर्वाद असल्याची भावना भाविकांनी व्यत केली. नीळकंठ भारती यांचे विचार आणि संस्कार सुमनबाईंनी जपले असल्याची भावना माजी सरपंच राजूरकर यांनी व्यत केली.