उन्ह तापलं; धाम प्रकल्पातलं पाणी आटलं!

    दिनांक :07-Jun-2026
Total Views |
केवळ ३७ टके; पाणी पाऊस लांबल्यास पाणीटंचाई
 
वर्धा, 
Water storage in the Dham project वर्धा शहरासह परिसरातील १४ गावांची तहाण भागवणार्‍या महाकाळी धरणात फत ३७ टके वापरण्याएवढाच पाणीसाठा शिलक आहे. उन्हामुळे भूगर्भातील पाणी पातळीही झपाट्याने खाली जात आहे. पाऊस लांबणीवर गेल्यास वर्धा शहरासह १४ गावात पाण्याची समस्या निर्माण होण्याची दाट शयता वर्तविण्यात येत आहे.
 
 
MAHAKALI
 (संग्रहित छायाचित्र)
 
 
एप्रिल आणि मे महिन्यातील तीव‘ उष्णतेमुळे तापमान ४७.५ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले होते. अनेक दिवस तापमान ४६ अंशांच्या आसपास कायम राहिल्याने जलाशयातील पाण्याचे मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन झाले. वाढत्या उष्णतेमुळे पिण्याच्या पाण्याची मागणीही वाढली. त्यामुळे जिल्ह्यातील लहान मोठ्या प्रकल्पाच्या जलसाठ्यावर अतिरित ताण निर्माण झाला आहे. गेल्यावर्षी मे महिन्यात जंगल परिसरात चांगला पाऊस झाला होता. त्यामुळे जलाशयातील पाणी पातळीत तुलनेने कमी घट झाली होती. मात्र, यावर्षी अवकाळी पाऊस न झाल्याने प्रकल्पातून मागणीनुसार सतत पाणी सोडले जात आहे. मे महिन्याच्या मध्यापर्यंत प्रकल्पात सुमारे ४७ टके जलसाठा होता. तो आता घटून चक ३७ टयांवर आला आहे.
 
 
Water storage in the Dham project  सामान्यतः जून महिन्यात मान्सूनचे आगमन होते. मात्र, यावर्षी हवामानातील असमतोलामुळे ७ जून उजाडल्यानंतरही पावसाने दांडी मारली. सध्याची हवामानस्थिती पाहता नजीकच्या काळातही समाधानकारक पावसाची शयता कमी असल्याचे दिसून येत आहे. तज्ज्ञांच्या मते, पावसाला सुरुवात झाल्यानंतरही जलाशयातील पाणी पातळी वाढण्यास काही काळ लागणार आहे. त्यामुळे धाम प्रकल्पातील सतत घटणारा जलसाठा चिंतेचा विषय ठरत आहे.