अभ्यंकर नगर, वर्मा लेआऊट, डागा लेआऊटसह अनेक ठिकाणी स्वच्छता मोहीम

    दिनांक :08-Jun-2026
Total Views |
dipti
 
अभ्यंकर नगर शिव मंदिर परिसरात स्वच्छता अभियान
अभ्यंकर नगर येथील शिव मंदिर परिसरात स्वच्छता अभियान उत्साहात राबविण्यात आले. या उपक्रमात मा. आमदार संजय भेंडे, नगरसेविका वर्षा जयंत ठाकरे, दीपक वानखेडे, राम मुंजे, कृष्णा काकडे, प्रकाश राजहंस, सुरेश वेळतकर, सुमेधा सेनाड, संगीता चंद्रायण, संगीता पाटील, नितीन महाजन तसेच परिसरातील अनेक नागरिक सहभागी झाले.
dipti
 
 
अभ्यंकर नगर उद्यान सफाई अभियान
प्रभाग क्रमांक 13 अभ्यंकर नगर येथील बगीच्यात सफाई अभियान करण्यात आले यात नगरसेवक विजय होले,माजी नगरसेविका वर्षा जयंत ठाकरे,वॉर्ड अध्यक्ष दिपक वानखेडे, शहर पदाधिकारी रामभाऊ मुंजे,बूथ प्रमुख, संध्या नारखेडे, सुमेधा सेनाड, संगीता पाटील, दिलीप बुरंगे, सुरेश वेळतकर, शक्ती प्रमुख प्रशांत जोशी,मनीष गेडाम उपस्थित होते

dipti  
यशवंत नगर येथील मैदानावर योगा ग्रुपतर्फे स्वच्छता अभियान
पर्यावरण संवर्धन आणि स्वच्छतेचा संदेश देण्यासाठी यशवंत नगर येथील मैदानावर योगा ग्रुपच्या वतीने स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या उपक्रमात योगा ग्रुपच्या सदस्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत परिसर स्वच्छ करण्यासाठी श्रमदान केले. या अभियानात गौरी सावरकर, राखी विमुला, रत्ना चौधरी, लता रामटेके, शालिनी बोंद्रे, सुरेखा महाकाळकर, सुनीता शेंदरे, अर्चना वारके, राजहंस काका, संतोष मराठे आणि वेळतकर यांनी सक्रिय सहभाग नोंदवला. यावेळी सहभागी सदस्यांनी परिसरातील कचरा गोळा करून स्वच्छतेचे महत्त्व नागरिकांपर्यंत पोहोचविले. स्वच्छ परिसर, निरोगी जीवन आणि पर्यावरण संवर्धनासाठी प्रत्येकाने योगदान देण्याची गरज असल्याचा संदेश यावेळी देण्यात आला. या उपक्रमाचे परिसरातील नागरिकांनी कौतुक केले.
 

dipti  
वर्मा लेआऊट हनुमान मंदिर परिसरात स्वच्छता अभियान
वर्मा लेआऊट येथील हनुमान मंदिर परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या अभियानादरम्यान मंदिर परिसर आणि आसपासच्या भागातून मोठ्या प्रमाणात कचरा तसेच रिकाम्या दारूच्या बाटल्या आढळून आल्या. परिसर स्वच्छ करताना नागरिकांनी स्वच्छता आणि सामाजिक जबाबदारीचा संदेश दिला.या स्वच्छता अभियानात शरदचंद्र लांबे, भास्करराव लोहकरे, मधुकर तापस, प्रभाकर महल्ले, नरेंद्र वाघमारे, प्रदीप गुरवे, वसुधा कठाळे, स्मिता किन्हेकर, प्रतिभा चंद्रीकापूरे, जयश्री पुरोहित, आरती सपकाळ, संघमित्रा जनबंधू, रेखा हिंगे, मायाताई बनसोड, गीता सुरसावंत, संगीता भगत, प्रणिता यादव, निलिमा हिंगणीकर, माधवी हटेवार, लता सदाफळ, गीता उत्साहात तसेच कविता रत्नपारखी यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.

dipti
 
 
डाग लेआऊट हनुमान मंदिर स्वच्छता अभियान
डाग लेआऊट येथील हनुमान मंदिर परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या उपक्रमात सुधा वैद्य, संध्या चोकसे, शिल्पा, वंदना, अरुणा, किशोरी, कल्पना, अर्चना आणि हेडाऊ यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत मंदिर परिसराची स्वच्छता केली.