काँग्रेस जिल्हाध्यक्ष अॅड. सचिन नाईक
यवतमाळ,
Adv. Sachin Naik स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्र्यांच्या हस्तक्षेपामुळे लोकशाही मूल्यांची पायमल्ली झाली असून मतदारांवर अन्याय करण्यात आला आहे, असा गंभीर आरोप काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड. सचिन नाईक यांनी केला आहे. तसेच काँग्रेसचे उमेदवार साहेबराव कांबळे यांच्यावर माघार घेण्यास पालकमंत्र्यांकडून दबाव आणण्यात आल्याचाही दावा करत, ही प्रक्रिया लोकशाहीसाठी घातक असल्याचेही अॅड. नाईक यांनी म्हटले. पुढे बोलताना ते म्हणाले, निवडणूक प्रक्रियेत पैशाचा आणि सत्तेचा गैरवापर झाल्याने लोकशाही धोक्यात आली आहे. काही उमेदवारांनी माघार घेतल्याने मतदारांना पर्यायापासून वंचित राहावे लागले असून ही बाब अत्यंत चिंताजनक आहे. सत्ताधाèयांचा वाढता उन्माद लोकशाही व्यवस्थेला मारक ठरत असल्याची टीकाही त्यांनी केली.
Adv. Sachin Naik काही नगरसेवकांनीदेखील या प्रकाराबाबत नाराजी व्यक्तकेली असून संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी जिल्हाधिकारी विकास मीना यांच्याकडे केली आहे. काँग्रेससह इतर पक्षांचे कार्यकर्ते आणि मतदारांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल करून या प्रकरणाची दखल घेण्याची मागणी केली आहे. जिल्ह्यातील स्थानिक प्रश्नांंशी कोणताही संबंध नसलेल्या व्यक्तीला महायुतीने उमेदवारी दिली आहे. या उमेदवाराला जिल्ह्याचे कोणतेही सोयरसुतक नाही असा व्यक्ती काय जिल्ह्याचे प्रश्न मांडणार असल्याचे मत यावेळी त्यांनी व्यक्त केले. सत्ताधाèयांच्या अशा भूमिकेविरोधात जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी आणि लोकशाही मूल्यांचे संरक्षण करण्यासाठी आता जनतेने अधिक सक्षम आणि आक्रमक भूमिका घेण्याची गरज आहे. त्यामुळे येत्या काळात काँग्रेसकडून विविध आंदोलने करण्यात येणार असल्याचे सांगितले.