अल्लीपूर,
Allipur Vitthal Temple pilgrimage अधिकमासानिमित्त आता सर्वत्र पुण्य कमावण्यासाठी धावाधाव सुरू आहे. या महिन्यात दानधर्म आणि देवदर्शनाला अधिक महत्त्व आहे. गावातील वारकरी विठू माऊलीच्या दर्शनाला पंढरपूरला जातात. येथील विठ्ठल रुमिणी देवस्थानने चक गावातील भताना एकत्र करीत केळकर येथील सिद्धी विनायक आणि चौकी येथील ब्रृहस्पती मंदिरात दर्शनासाठी पाठवण्यात आले. माजी खासदार व विठ्ठल रुमिणी देवस्थानचे अध्यक्ष सुरेश वाघमारे यांना चालक व वाहकांचा सन्मान करीत त्यांना तिर्थाटनाकरिता रवाना केले.
आज ८ रोजी सकाळी ९ वाजता विठ्ठल मंदिरपासून भाविक एसटीने गणेश सिद्धी विनायक केळझर व ब्रृहस्पती मंदिर चौकी येथे तीर्थाटनासाठी भाविक गेले. त्यामध्ये बाराही महिने देवस्थानला सेवा देणारे भजन मंडळ, कीर्तन प्रवचन हरिपाठ, आरती, काकड आरती व अन्य कार्यक्रमात सहभाग देणार्या व अन्नदाते या सर्वांना घेऊन तीर्थाटनासाठी रवाना झाले. प्रवासाला निघण्याआधी हिंगणघाटचे आगार वाहतूक Allipur Vitthal Temple pilgrimage निरीक्षक ममता व चालक बाळू क्षीरसागर यांचे देवस्थान कमिटीचे अध्यक्ष सुरेश वाघमारे यांनी त्यांचा सन्मान केला. यावेळी कमिटीचे बळवंत कापसे, चंद्रभान साखरकर, सुनील गुळघाणे, विठ्ठल सुरकार खत्री व इतर सेवाधारी मंडळी उपस्थित होती.