पुणे,
Atal Setu incident, नवी मुंबईतील अटल सेतूवर रविवारी मध्यरात्री घडलेल्या धक्कादायक घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. मुंबई आणि नवी मुंबईला जोडणाऱ्या या महत्त्वपूर्ण समुद्री पुलावरून एका २८ वर्षीय तरुणाने समुद्रात उडी मारल्याची घटना समोर आली असून, संबंधित तरुण अद्याप बेपत्ता आहे. या घटनेनंतर पोलीस, नौदल आणि कोस्ट गार्डच्या पथकांकडून शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे.
प्राप्त माहितीनुसार, प्रतीक सुभाष रासकर (वय २८) असे बेपत्ता तरुणाचे नाव आहे. ही घटना रविवारी पहाटे सुमारे १ ते २ वाजण्याच्या दरम्यान घडली. अटल सेतूवर पोहोचल्यानंतर त्याने आपली कार मधोमध थांबवून अचानक समुद्रात उडी मारल्याचे सीसीटीव्ही फुटेज आणि सुरक्षा रक्षकांच्या निरीक्षणातून स्पष्ट झाले आहे. या प्रकरणी उलवे पोलीस ठाण्यात हरवल्याची नोंद करण्यात आली आहे.पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, प्रतीक रासकर हा पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील रहिवासी असून तो शेअर मार्केट क्लासेसशी संबंधित काम करत होता. घटनेच्या काही तास आधी त्याने घरच्यांना “जेवायला जात आहे” असे सांगून घरातून कार घेऊन बाहेर पडल्याचे समजते. मात्र, तो थेट अटल सेतूकडे गेला आणि तेथे पोहोचल्यानंतर ही धक्कादायक घटना घडली.घटनेची Atal Setu incident, माहिती मिळताच उलवे पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर नौदल, कोस्ट गार्ड आणि स्थानिक मच्छिमारांच्या मदतीने समुद्रात शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे. मात्र, अद्याप तरुणाचा शोध लागलेला नाही.या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, अटल सेतूवरील सुरक्षा व्यवस्थेबाबतही पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.