सिंदखेडराजा येथे पू. संत बालकृष्ण महाराज यांच्यावर हल्ला

*दोषींवर कारवाईची सनातन हिंदू जागरण यात्रा समितीची मागणी

    दिनांक :08-Jun-2026
Total Views |
बुलढाणा, 
attack-on-saint-balkrishna-maharaj : सिंदखेडराजा येेथे पू. संत श्री बालकृष्ण महाराज यांच्यावर झालेल्या हल्लयाप्रकरणी दोषींना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करावी अशी मागणी सनातन हिंदू जागरण यात्रा समिती महाराष्ट्रच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदनातून करण्यात आली आहे. यासंदर्भात पत्रकार भवन येथे पत्रकार परिषद घेण्यात आली. या पत्रकार परिषदेला विहिपचे अ‍ॅड. जयंत जोशी, अ‍ॅड. अमोल अंधारे, शरद भाला, माधव धूंदळे, संत विवेक दासजी, अमोलानंद गिरीजी, पंचायती आखाडा महानिर्वाणी, हभप गजानन महाराज सपकाळ, प्रशांत जवंजाळ, अजय मिस्कीन, प्रामख्याने उपस्थित होते.
 

kl 
 
 
दि. ६ जून रोजी सिंदखेडराजा येथे गौ सन्मान आव्हान अभियानाचे महाराष्ट्र प्रभारी पूज्य संत श्री बालकृष्ण महाराज यांच्यावर काही असामाहिजक घटककांनी केलेला हल्ल ा अत्यंत गंभीर व निषेधार्थ आहे. या घटनेत महाराजांना शारीरिक व मानसिक त्रास सहन करावा लागला त्यांच्यावर वैद्यकीय उपचार करावे लागले. याप्रकरणी अज्ञात आरोपीविरूद्ध गुन्दा दाखल झाल्याचे समजते या प्रकरणातील सर्व आरोपींना तात्काळ अटक करून त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात अशी पत्रकार परिषदेमध्ये केली. जर पूढील २ ते ३ दिवसात दोषींविरूद्ध ठोस कारवाई व अटक प्रक्रिया पूर्ण झाली नाही. तर संत समाज, गोभक्त, सकल हिंदू सामज व विविध सामाजिक संघटनांना लोकशाही मार्गाने शांततापूर्ण आंदोलन धरणे व जनआंदोलन करण्यास बाध्य व्हावे लागेले प्रशासन न्याय देईल व दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदनावर रा. स्व. संघाचे चित्तरंजन राठी तसेच अरूण देशमुख, बजरंग दल मयूर खडके, डॉ. गायत्री सावजी, अशोक अग्रवाल यांच्या स्वाक्षर्‍या आहेत.