विक्रम गोखले यांच्या अखेरच्या ‘बेवारस'

चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

    दिनांक :08-Jun-2026
Total Views |
मुंबई
Bewaras मराठी रंगभूमी तसेच मराठी-हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ आणि दिग्गज अभिनेते दिवंगत विक्रम गोखले यांच्या अखेरच्या चित्रपटांपैकी एक असलेल्या ‘बेवारस सत्य एका वळणावरचं’ या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित करण्यात आला. हृदयस्पर्शी कथानक, दमदार कलाकारांची फळी आणि सामाजिक आशयाची प्रभावी मांडणी यामुळे या चित्रपटाबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. हा चित्रपट येत्या २५ जून रोजी जगभर प्रदर्शित होणार आहे.
 
 

Bewaras Satya Eka Valanavarach Movie, Bewaras Marathi Movie, Vikram Gokhale Last Movie, 
हरिणी प्रॉडक्शन्स निर्मित आणि शिव आर्यन फिल्म्स प्रस्तुत या चित्रपटाची निर्मिती सौ. रिया कुमार, नितीन विचारे आणि शिव आर्यन यांनी केली आहे. चित्रपटाची कथा विजय राणे यांची असून दिग्दर्शनाची धुरा विजय राणे आणि सौ. रिया कुमार यांनी सांभाळली आहे. क्रिएटिव्ह दिग्दर्शन नितीन विचारे यांचे असून पटकथा, संवाद, गीतलेखन आणि संगीत दिग्दर्शनाची जबाबदारी शिरीष लाटकर आणि विवेक आपटे यांनी पार पाडली आहे. चित्रपटाच्या शीर्षक गीताचे लेखन सौ. रिया कुमार यांनी केले असून संगीतकार बिपलाब दत्ता यांनी त्याला स्वरबद्ध केले आहे.
 
 
चित्रपटाच्या तांत्रिक Bewaras बाजूलाही विशेष बळ मिळाले आहे. यूजीन डिसोझा आणि योगेश कोळी यांनी छायांकन केले असून अमीर हडकर यांनी पार्श्वसंगीत दिले आहे. यश सुर्वे यांनी संकलनाची जबाबदारी सांभाळली असून कलाकार निवडीचे काम नितीन विचारे यांनी केले आहे.‘बेवारस – सत्य एका वळणावरचं’ या चित्रपटात विक्रम गोखले यांच्यासह तेजस्विनी पंडित, रोहिणी हट्टंगडी, उषा नाईक, निहार गिते, ऋतुजा बागवे, उदय टिकेकर, श्रीजित मराठे आणि आदित्य देशमुख यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. चित्रपटात विक्रम गोखले यांनी अनाथालय चालवणाऱ्या तत्त्वनिष्ठ आबाजींची भूमिका साकारली आहे. एका पायाने अधू असलेल्या अनाथ मुलाच्या न्यायासाठीच्या संघर्षाची कथा या चित्रपटात मांडण्यात आली आहे. त्याचबरोबर समाजातील विविध वास्तवांवरही प्रकाश टाकण्याचा प्रयत्न चित्रपटातून करण्यात आला आहे.प्रदर्शित झालेल्या टीझरमध्ये विक्रम गोखले यांच्या संवेदनशील आणि भावनिक अभिनयाची प्रभावी झलक पाहायला मिळते. त्यांच्या अभिनयातील गांभीर्य आणि पात्राशी असलेली एकरूपता प्रेक्षकांना भावणारी ठरत आहे. सामाजिक आशय, भावनिक कथानक आणि अनुभवी कलाकारांचा अभिनय यांचा संगम असलेला हा चित्रपट प्रेक्षकांना एक वेगळा आणि विचारप्रवर्तक अनुभव देईल, असा विश्वास निर्मात्यांनी व्यक्त केला आहे.टीझरला मिळणारा सकारात्मक प्रतिसाद पाहता ‘बेवारस – सत्य एका वळणावरचं’ या चित्रपटाविषयीची उत्सुकता दिवसेंदिवस वाढत असून, विक्रम गोखले यांच्या अखेरच्या पडद्यावरील अभिनयाचे दर्शन घेण्यासाठी प्रेक्षक आतुर असल्याचे चित्र दिसत आहे.