नदीत बोट उलटली, दोन तरुण बुडाले

5 तरुणांनी पोहून वाचविला स्वतःचा जीव

    दिनांक :08-Jun-2026
Total Views |
भंडारा
Bhandara boat accident नदी पात्रात मधोमध असलेल्या बेटावर आंघोळीसाठी गेलेल्या तरुणांची बोट उलटून दोन तरुणांचा मृत्यू झाला आहे. दुर्घटनेतील पाच तरुणांनी पोहून बाहेर येत स्वतःचा जीव वाचविला आहे. प्रशासनाकडून मृतदेहांचा शोध घेण्याचे कार्य सुरू आहे. वैनगंगा नदीत जलसमाधी मिळाली आहे.
 

Bhandara boat accident 
वैनगंगा नदीच्या काठावर असलेल्या करचखेडा नदी घाटावरून भंडारा आणि परिसरातील गावामधील 7 मित्र 7 जून रोजी संध्याकाळी नदीकाठावरून नदीच्या मधोमध असलेल्या बेटावर एका खाजगी बोटीने आंघोळीसाठी गेले. आंघोळ करून परत येत असताना सात मित्र बसले असलेले ही बोट रात्री 7 वाजताच्या सुमारास पाण्यात उलटली. यावेळी भंडारा येथील कृष्णा बोकडे आणि पवन चौबे हे दोघे पाण्यात बुडाले. त्र उर्वरित आकाश केवट, सुबोध ढोक, काशिनाथ मेश्राम, मृणाल मंदूरकर, अर्जुन मेश्राम या पाच जणांनी पोहून नदी बाहेर पडून स्वतःचा जीव वाचवीला.
घटनेची माहिती होताच गावकऱ्यांनी नदी काठावर एकच गर्दी केली. जिल्हा आणि पोलीस प्रशासनाला माहिती देण्यात आली. काल काही काळ शोध कार्य राबविल्यानंतर आज 8 रोजी प्रशासनाकडून बुडालेल्या तरुणांचा शोध घेतला जात आहे.