राम मंदिर,श्री महालक्ष्मी मंदिरात स्वच्छता अभियान

    दिनांक :08-Jun-2026
Total Views |

sona
 
 
एनआयटी फ्रेंड्स लेआऊट, नरेंद्र नगर
Cleanliness at Shri Mahalakshmi Temple एनआयटी फ्रेंड्स लेआऊट, नरेंद्र नगर येथे स्वच्छता अभियान उत्साहात पार पडले. परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्याच्या उद्देशाने आयोजित या उपक्रमात स्थानिक नागरिक, लोकप्रतिनिधी, महानगरपालिका अधिकारी आणि स्वच्छता कर्मचाऱ्यांनी सक्रिय सहभाग घेतला.या अभियानात उषा हिंदारिया, मंदा चिंचखेडे, समीक्षा पिंपळे, नीलिमा गंधेवार, सुनीता पाल, प्रमिला बहादुरे, संगीता खुणे, जया बारापात्रे, उषा चौधरी आणि नरकेसरी प्रकाशनाच्या मीरा कडबे यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. तसेच नगरसेवक संदीप गवई, रमेश भंडारी, नगरसेविका पूजा भुगावकर, नागपूर महानगरपालिकेच्या झोनल प्रमुख,वाघमारे, प्रामोद वानखेडे (दक्षिण झोन प्रमुख) तसेच अनेक स्वच्छता कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती. यावेळी परिसरातील कचरा साफ करून स्वच्छतेचा संदेश देण्यात आला. नागरिकांनी स्वच्छता ही केवळ प्रशासनाची नव्हे तर प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी असल्याचे सांगत नियमितपणे परिसर स्वच्छ ठेवण्याचा संकल्प केला. स्वच्छ आणि निरोगी नागपूरच्या दिशेने हे अभियान एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरले.
 
 

sona  
राम मंदिर बालपांडे लेआऊट
पर्यावरण संवर्धन आणि स्वच्छतेचा संदेश देण्यासाठी राम मंदिर, बालपांडे लेआऊट, संताजी सोसायटी, नरेंद्र नगर येथे स्वच्छता अभियान उत्साहात राबविण्यात आले. या अभियानात उषा हिंदारिया, मंदा चिंचखेडे, समीक्षा पिंपळे, नीलिमा गंधेवार, सुनीता पाल, प्रमिला बहादुरे, संगीता खुणे, जया बारापात्रे, उषा चौधरी आणि नरकेसरी प्रकाशनाच्या मीरा कडबे यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. तसेच नगरसेवक संदीप गवई, रमेश भंडारी, नगरसेविका पूजा भुगावकर, नागपूर महानगरपालिकेच्या झोनल प्रमुख,वाघमारे, प्रामोद वानखेडे (दक्षिण झोन प्रमुख) तसेच अनेक स्वच्छता कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती. यावेळी परिसरातील कचरा साफ करून स्वच्छतेचा संदेश देण्यात आला. नागरिकांनी स्वच्छता ही केवळ प्रशासनाची नव्हे तर प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी असल्याचे सांगत नियमितपणे परिसर स्वच्छ ठेवण्याचा संकल्प केला. स्वच्छ आणि निरोगी नागपूरच्या दिशेने हे अभियान एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरले.

sona  
श्री महालक्ष्मी मंदिर, मधुबन लेआऊट
नागपूर येथील मधुबन लेआऊटमधील श्री महालक्ष्मी मंदिर परिसरात स्वच्छता अभियान उत्साहात पार पडले. मंदिर परिसर स्वच्छ व सुंदर ठेवण्याच्या उद्देशाने आयोजित या उपक्रमात मंदिराच्या योगवर्गातील योगबंधू आणि योगभगिनींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.या स्वच्छता अभियानात शरदचंद्र लांबे, भास्करराव लोहकरे, मधुकर तापस, प्रभाकर महल्ले, नरेंद्र वाघमारे, प्रदीप गुरवे, वसुधा कठाळे, स्मिता किन्हेकर, प्रतिभा चंद्रीकापूरे, जयश्री पुरोहित, आरती सपकाळ, संघमित्रा जनबंधू, रेखा हिंगे, मायाबनसोड, गीता सुरसावंत, संगीता भगत, प्रणिता यादव, निलिमा हिंगणीकर, माधवी हटेवार, लता सदाफळ, गीता उत्साहात तसेच कविता रत्नपारखी यांनी सक्रिय सहभाग घेतला.