नागपूर,
Shri Gajanan Maharaj Temple नागपूर महानगरपालिकेच्या आवाहनानुसार आणि राष्ट्रीय पर्यावरण मोहिमेचा एक भाग म्हणून, सहकार नगर येथील स्थानिक 'संत श्री गजानन महाराज मंदिर' परिसरात भाविक व पदाधिकाऱ्यांनी स्वच्छता मोहीम राबवली. छायाचित्रात (डावीकडून उजवीकडे) विठ्ठलराव मैंद, गणेश केणे, आशुतोष कुलकर्णी, प्रसाद वझरकर (सचिव), अनंतराव कुलकर्णी आणि माजी रणजी ट्रॉफी क्रिकेटपटू मदन कावरे हे मंदिर परिसर स्वच्छ करताना दिसत आहेत.