नागपूर,
Tatya Tope Nagar चला करू या मंदीर,उद्यानाची स्वच्छता या मनपा आणि तरुण भारत च्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमा अंतर्गत आज सोमवार दिनांक ८.६.२०२६ ला सकाळी आठ वाजेपासून गणेश मंदीर, तात्या टोपे नगर, नागपूर येथे मंदीर आणि परिसराची स्वच्छता करण्यात आली. या उपक्रमात खालील नागरिकांनी सक्रीय सहभाग घेतला. श्री. प्रकाश रथकंठीवार, श्री. संजय खांडवे, श्री. आनंद मुळे, श्री. सुनिल घिरणीकर, श्रीमती किशोरी कुडकर्णी, सौ. राखी पाटील, श्री. किशोर मुळे, श्री. सारंग सावंगीकर, श्री. मिलींद नाईक, श्री. सुधाकर महाजन, श्री. अजय पंडे, श्री. अनंत देहाडराय, श्री. विवेक वैद्य, श्री. जयंत पात्रीकर, श्री. स्वप्नील येरूपूडे, श्री.सुशिल ढवळे, श्री. राजेश पाटील, श्री. सुरेश भाके, श्री. राजु देवघरे,श्री. अनंता आंभोरकर, श्री. मंगरुळकर इत्यादी नागरिक आणि मनपा कर्मचारी सहभागी झाले.