अंगणातील बगीचा स्पर्धा बक्षीस वितरण
यवतमाळ,
Dr. Nitin Kharche ज्येष्ठ नागरिक मंडळ आयोजित जागतिक पर्यावरण दिनी यवतमाळ अर्बन बँकेचे अध्यक्ष डॉ. नितीन खर्चे यांना जलसंधारणार्थ केलेल्या अतुलनीय कार्यासाठी ज्येष्ठ नागरिक मंडळाचा ‘पर्यावरण रक्षक पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी पक्षीतज्ञ डॉ. प्रवीण जोशी म्हणाले, ई-बर्ड या स्थळावर यवतमाळ नाव टाकल्यास त्या ठिकाणी त्यांनी नोंदवलेल्या यवतमाळ परिसरात आढळणाèया 346 पक्षांची यादी आणि छायाचित्रे आढळतील. पक्षी अभ्यासात एका लहानशा पक्षाने 11 दिवस कुठेही न थांबता 13500 किलोमिटर प्रवास केल्याची नोंद असल्याचे, तसेच सर्वाधिक वेगवान पक्षी ताशी 340 किमी वेगाने उड्डाण करतो, अशी रंजक माहिती त्यांनी दिली.
सहायक वनसंरक्षक दादासाहेब तौर, मंडळाचे मुख्य सल्लागार बळवंत चिंतावार, महिलाप्रमुख शीला कांबळे यांचीही प्रमुख उपस्थिती होती. मंडळाच्या बगिचा स्पर्धेत जयश्री मेहंदळे यांना प्रथम, शरद मन्नेरवार यांना द्वितीय आणि डॉ. रवींद्र दुर्गे यांना तृतीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. संचालक ओंकार ढोले यांनी संचालन केले. डॉ. नितीन खर्चे यांना शाल, गुलाबपुष्प रोपटे, सन्मानपत्र आणि स्मृतिचिन्ह देऊन ज्येष्ठ संचालक विजय उपलेंचवार व प्रकाश दामले व मान्यवरांच्या हस्ते ‘पर्यावरण रक्षक’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. सन्मानपत्राचे वाचन यशवंत पाटील यांनी केले.
Dr. Nitin Kharche स्वतःचा पावसाच्या पाण्याचा पुनर्भरणाचा नमुना विकसित करून त्याचे स्वतःच्या घरासमोरील मोकळ्या मैदानावर 2005 साली प्रयोग केले. तत्पूर्वी पाण्याचा दुष्काळ अनुभवलेल्या या विश्वासनगर परिसरातील सर्व विहिरींच्या पाणीपातळीत अमूलाग्र वाढ होऊन परिसर पाणी टंचाईमुक्त झाला, अशी माहिती यावेळी डॉ. नितीन खर्चे यांनी दिली. घराघरातील पावसाच्या पाण्याचे पुनर्भरणाचे असेच मॉडेल विकसित करण्यात आले. या उपक्रमाचे प्रात्यक्षिकांसह दृकश्राव्य सादरीकरण डॉ. खर्चे यांनी केले. दादासाहेब तौर यांनी वृक्षांच्या पर्यावरणातील स्थानाची महती सांगितली. बळवंत चिंतावारांच्या मार्गदर्शनानंतर, आज ज्येष्ठ नागरिकांनी पर्यावरण रक्षणार्थ संकल्पकृत व्हावे, अशी अपेक्षा अध्यक्ष राजन टोंगो यांनी व्यक्त केली.
कार्यक्रमाचे संचालन स्वाती सहस्रबुद्धे यांनी केली. सचिव पांडुरंग ढुमणे यांनी प्रास्ताविक केले. उपाध्यक्ष विनोद सहस्रबुद्धे यांनी डॉ. प्रवीण जोशी यांचा परिचय करून दिला. प्रल्हाद हिंगमिरे यांनी आभारप्रदर्शन केले. सहसचिव पांडुरंग मुसळेंद्वारा संचालित वृक्षारोपणाने कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली. सरस्वतीपूजन आणि दीपप्रज्वलनासह, कृष्णा तपके यांच्या स्वागतगीताने प्रारंभ झाला. या आयोजनात संचालक प्रा. अनिल दुर्गे, चित्रा देशपांडे आणि ज्येष्ठ कट्टा संचालक दिवाकर तिरमारे, व्यवस्थापक विनोद राजनकर यांचा विशेष सहभाग होता.