फुटाळा तलावाजवळ आढळले तीन महिन्यांचे भ्रूण

    दिनांक :08-Jun-2026
Total Views |
अनिल कांबळे
नागपूर, 
Foetus found near Futala Lake नेहमी गजबजलेल्या फुटाळा तलावाजवळ असलेल्या एलआयटी विद्यापीठ परिसरात सोमवारी सुमारे तीन ते चार महिन्यांचे भ्रूण आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. परिसरात सुरू असलेल्या बांधकामादरम्यान मजुरांना संशयास्पद वस्तू दिसून आली. जवळ जाऊन पाहणी केली असता भ्रूण असल्याचे निदर्शनास आले. या प्रकरणी अंबाझरी पोलिसांना अज्ञात मातेविरुद्ध कायदेशिर कारवाई
 

bhrun 
 (संग्रहित छायाचित्र)
 
Foetus found near Futala Lake  घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनोद गोडबोले पथकासह घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी भ्रूण ताब्यात घेऊन पुढील तपासासाठी वैद्यकीय तपासणीकडे पाठविला आहे. प्राथमिक तपासात हे भ्रूण सुमारे तीन ते चार महिन्यांचा असावा, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मात्र ते भ्रूण स्त्री किंवा पुरुष याबाबत अद्याप स्पष्टता आलेली नाही. वैद्यकीय अहवाल आल्यानंतरच याबाबत निश्चित माहिती मिळू शकणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. विद्यापीठ परिसरात भ्रूण आढळल्याने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. अनैतिक संबंधातून गर्भधारणा झाल्यानंतर बाळाच्या जन्माची लपवणूक करण्याच्या उद्देशाने हा प्रकार घडल्याची चर्चा होती. या परिसरात मोठ्या प्रमाणावर बांधकाम सुरू असल्याने तेथे कार्यरत मजूर तसेच त्यांच्या कुटुंबीयांचीही चौकशी करण्यात येत आहे. अंबाझरी पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून वैद्यकीय अहवालानंतर या प्रकरणाचे गूढ उकलण्यास मदत होणार असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.