लडाखच्या लेकीची कारगिल ते आयआयटी भरारी

जेईई अ‍ॅडव्हान्समध्ये रचला इतिहास

    दिनांक :08-Jun-2026
Total Views |
द्रास
jee Advanced लडाखचा कारगिल जिल्ह्यातील द्रास हा भाग बहुतांश काळ बर्फाने गारठलेला असतो. यावेळी या परिसराची चर्चा एका वेगळ्याच कारणाने होत आहे. येथील खंडा गावात राहणाऱ्या युवतीने जेईई अ‍ॅडव्हान्समध्ये मोठे यश मिळवित थेट आयआयटीपर्यंत झेप घेतली आहे.

isma 
 
jee Advanced इस्मा जबीन असे या युवतीचे नाव असून तिने अखिल भारतीय स्तरावर 723 वी जागा पटकावली आहे. यंदा लडाखमधून जेईई अ‍ॅडव्हान्स परीक्षा देणाèया मोजक्या मुलींमध्ये इस्माचा समावेश आहे. विशेष म्हणजे, तिच्या कुटुंबातून ही परीक्षा देणारी आणि उत्कृष्ट रँकने उत्तीर्ण होणारी ती पहिलीच सदस्य आहे.
 
jee Advanced तिच्या कुटुंबात यापूर्वी कोणीही जेईई अ‍ॅडव्हान्स परीक्षा देण्याचा गांभीर्याने विचार केला नव्हता. तिच्या यशा नंतर आता आसपासचे विद्यार्थीही या परीक्षेबद्दल माहिती घेऊ लागले आहेत. इस्मासाठी हे केवळ वैयक्तिक यश नसून संपूर्ण परिसरासाठी एक मोठी प्रेरणा आहे. इस्माचा कल सिव्हिल इंजिनीयरिंगकडे असून तिला भविष्यात लडाखमध्येच वास्तव्य करायचे आहे, हे विशेष.