सारंगगार गणनेत आढळली पाणपक्ष्यांची ४३८ घरटी

    दिनांक :08-Jun-2026
Total Views |
हिंगणघाट,
Hinganghat saranggar census हिंगणघाट शहरातील तहसील, पंचायत समिती, जि. प. उप-अभियंता कार्यालय परिसरात ३६ झाडांवर पाणपक्ष्यांची मिश्र विणवसाहत आहे. रविवार ७ रोजी सारंगगारातील घरट्यांची गणना करण्यात आली. या वसाहतीमध्ये ५ प्रजातींच्या पाणपक्ष्यांची ४३८ घरटी आढळली. या गणनेचे आयोजन येथील निसर्गसाथी फाउंडेशन व महाराष्ट्र पक्षिमित्र वर्धा यांच्या संयुत वतीने करण्यात आले होते.
 

Hinganghat saranggar census  
काही पाणपक्षी अजूनही घरटी बांधत असल्याचे दिसून आले. काही दिवसांमध्ये घरट्यांच्या संख्येत नकीच वाढ होईल. मुख्य म्हणजे, यावेळेस परिसरातील दोन करंज वृक्ष पक्ष्यांनी नव्यानेच घरटी बनविण्यासाठी निवडले असल्याने झाडांची संख्या आता ३८ झाली आहे. परिसरातील व रस्त्याच्या कडेला असलेले देशी बाबूळ, आंबा, खोटा अशोक, शिसम, करंजी, वड, पिंपळ, केशिया सेमिया, गुलमोहर या झाडांवर ही घरटी आहेत. पाणपक्ष्यांच्या या विणवसाहतीला मराठीत सारंगगार तर इंग्रजीमध्ये हेरॉनरी म्हणतात. हे विदर्भातील मोठे सारंगगारा पैकी एक आहे. दरवर्षी मे महिन्याच्या पहिल्या आठवड्याला पाणपक्षी या परिसरामध्ये घरटी बांधायला सुरुवात करतात. घरट्यांची गणना करून त्यांचे संरक्षण करणे. त्याबद्दल माहिती गोळा करणे या हेतूने या प्रजातीनिहाय घरटी गणनेचा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो.
या घरटी गणनेत गायHinganghat saranggar census  बगळा (कॅटल इग्रेट) ३९६ घरटी, छोटा बगळा (लिटील इग्रेट) १७, छोटा पानकावळा (लिटील कॉर्मोरंट) ४, भारतीय पानकावळा (इंडिअन कॉर्मोरंट) १० तर रात ढोकरी (ब्लॅक-क्राउंड नाईट हेरॉन) यांनी ११ अशी एकूण ४३८ घरट्यांची नोंद करण्यात आली आहे.
 
या गणनेत निसर्गासाथीचे अध्यक्ष प्रवीण कडू, महाराष्ट्र पक्षीमित्रचे राहुल वकारे, माजी वनपाल अशोक भानसे, अ‍ॅड. पवन दरणे, पंचशील थूल, चित्रा इंगोले, प्रमोद इंगोले, प्रशांत भोयर, समीर बक्ष, गणेश पोलकडे, यशवंत शिवणकर, शामिल बक्ष, अंजोर कडू, अफान बक्ष व शिवांशू थूल यांनी घरटी गणनेच्या कार्यात सहभागी झाले होते.