जळगाव जामोद प्रकरणाचा अवहाल सादर करा

पोलिस महासंचालक सदानंद दाते यांचे आदेश

    दिनांक :08-Jun-2026
Total Views |
अमरावती,
sadanand-date : राज्याचे पोलिस महासंचालक सदानंद दाते सोमवारी अमरावती दौर्‍यावर आले होते. त्यांनी राज्यात गाजात असलेल्या बुलढाण्यातील जळगाव जामोद प्रकरणाचा आढावा घेतला. या प्रकरणात अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक महेश पाटील यांना दोन दिवसात चौकशी अहवाल त्यांनी मागितला. या अहवालाच्या आधारे प्रकरणात पुढील कारवाईची दिशा निश्चित होणार आहे.
 
 
 
jlk
 
 
पोलिस महासंचालक दाते यांनी अमरावती परिक्षेत्रातील अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशीम आणि यवतमाळ जिल्ह्यांच्या पोलिस अधीक्षकांसोबत सविस्तर आढावा बैठक घेतली. बैठकीनंतर त्यांनी अमरावतीत पत्रकारांशी अनौपचारिक संवाद साधला. यावेळी त्यांनी जळगाव जामोद प्रकरणातील काही निरीक्षणे नोंदवली. अनौपचारिक चर्चेदरम्यान डीजीपी दाते यांनी चुकीच्या व्यक्तींवर कारवाई करण्यात आल्याचे सूचित केले. ही बाब गंभीर त्रुटी असल्याचे त्यांनी नमूद केले. कोणत्याही निर्दोष व्यक्तीवर कारवाई होऊ नये, यावर त्यांनी भर दिला. वास्तविक दोषींविरुध्द कठोर कारवाई केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. या प्रकरणातील मृत व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नसून, ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान या प्रकरणातील सविस्तर चौकशी अहवाल आयजींकडून पुढील दोन दिवसांत डिजीपींनी मागितला आहे. या अहवालाच्या आधारे पुढील कारवाई निश्चित केली जाईल. चौकशीत दोषी आढळणार्‍यांविरुध्द कठोर कारवाई केली जाणार असल्याचे संकेत यावेळी देण्यात आले आहे.
 
 
अमरावतीत परिविक्षाधीन कालावधी
 
 
माझा परिविक्षाधीन कालावधी अमरावतीतच पूर्ण झाला. त्यामुळे माझे अमरावतीशी भावनिक नाते आहे. तेव्हा सहाय्यक पोलिस अधीक्षक म्हणून काम पाहिले. अमरावती हे मला आवडणार्‍या शहरांपैकी एक आहे, असे सांगून त्यांनी अनेक जुन्या आठवणींना उजाळा दिला.