संघटना बळकट करून जनसामान्यांचे प्रश्‍न सोडवा

(माजी आमदार कृष्णा गजबे यांचे आवाहन) (कुरखेडा येथे भाजपाची संघटनात्मक बैठक)

    दिनांक :08-Jun-2026
Total Views |
कडोली, 
krishna-gajbe : भारतीय जनता पार्टी हा तळागाळातील सामान्य कार्यकर्त्यांच्या बळावर उभा असलेला पक्ष आहे. संघटनात्मक पातळीवर काम करताना प्रत्येक कार्यकर्त्याने सजग राहून केंद्र व राज्य सरकारच्या लोककल्याणकारी योजना समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवणे गरजेचे आहे. आगामी काळातील आव्हानांना समोरे जाण्यासाठी आणि पक्षाची पकड अधिक मजबूत करण्यासाठी बूथ पातळीवरील संघटन बळकट करुन जनसामान्यांचे प्रश्‍न सोडवा, असे आवाहन माजी आमदार कृष्णा गजबे यांनी केले.
 
 
 
jhnk
 
 
 
भारतीय जनता पार्टी तालुका कुरखेडाच्यावतीने भाजपा संघटनात्मक बळकटीकरण आणि विविध स्थानिक जनहितार्थ विषयांसंदर्भात 7 जून रोजी भाजप कार्यालयात एका महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी भाजपा तालुकाध्यक्ष चांगदेव फाये होते. यावेळी भाजपाचे जेष्ठ नेते गणपत सोनकुसरे, आदिवासी आघाडी तालुकाध्यक्ष रमेश पुराम, जिल्हा ओबीसी आघाडी उपाध्यक्ष रमेश बावनथडे, जिल्हा सचिव रूपाली कावळे, रंजना मेश्राम, सुनिता दखने, कल्पना मांडवे, शितल लांजेवार, कविता खडसे, कृष्णा चंद्रमा, उल्हास देशमुख, तीर्थराम राकडे, ज्ञानेश्‍वर शेडमाके, तुषार कुथे आदी उपस्थित होते.
 
 
 
पुढे बोलताना माजी आमदार गजबे म्हणाले की, कुरखेडा तालुक्यातील जनतेचे प्रश्‍न, शेतकर्‍यांच्या समस्या आणि विकासात्मक कामे मार्गी लावण्यासाठी भाजपा सदैव कटिबद्ध आहे. सर्व कार्यकर्त्यांनी आपापसातील समन्वय राखून जनतेच्या सुख-दुःखात सहभागी व्हावे आणि पक्षाची ध्येयधोरणे घराघरांपर्यंत पोहोचवावीत, असे आवाहन त्यांनी केले.
 
 
बैठकीला राहुल गिरडकर, जगदीश कुमरे, सचिन फुलबांधे, अंग्रेज कराडे, गोकुळदास धुर्वे, निमराव लोथे, अहिल्या लोथे यांच्यासह तालुक्यातील अनेक प्रमुख पदाधिकारी, शक्तीकेंद्र प्रमुख आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.