खैरे कुणबी समाजातर्फे गुणवंत विद्यार्थी व खेळाडूंचा गौरव

    दिनांक :08-Jun-2026
Total Views |
नागपूर,
Kusumtai Wankhede Hall खैरे कुणबी समाज पश्चिम नागपूरच्या वतीने दहावी व बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा रविवारी कुसुमताई वानखेडे सभागृह येथे उत्साहात पार पडला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निलेश महाजन होते. प्रमुख वक्ते म्हणून डॉ. दिलीप भोयर, पुणीत मातकर, रत्नाकर मुळीक आणि डॉ. महेश महाजन यांनी विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रातील विविध संधी व करिअरविषयक मार्गदर्शन केले.
 
 
khr
 
यावेळी दहावी-बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार करून त्यांना उपहार देण्यात आले. तसेच गुणवत्ता प्राप्त विद्यार्थी-विद्यार्थिनी आणि महिला खेळाडूंना रोख बक्षीस देऊन गौरविण्यात आले. Kusumtai Wankhede Hall  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैशाली राऊत यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी महादेव वैद्य, मोहनराव डंभारे, राजेश पिंपळे, राजेंद्र महाजन, राजीव धानोरकर, गिरीश कावळे यांच्यासह संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.
सौजन्य: तेजेंद्र गिरडे,संपर्क मित्र