MP Sports Badminton Tournament अलीकडे आयोजित करण्यात आलेल्या खासदार क्रीडा बॅडमिंटन स्पर्धेत ९ वर्षांखालील मुलांच्या एकेरी गटात अयान ताम्हाण याने उत्कृष्ट कामगिरी करत विजेतेपद पटकावले.अंतिम सामन्यात अयानने अरिश निमजे याचा १५-११, १५-०२ अशा सरळ गेममध्ये पराभव करून विजेतेपदावर आपले नाव कोरले. स्पर्धेच्या सुरुवातीपासूनच अयानने सातत्यपूर्ण आणि दर्जेदार खेळाचे प्रदर्शन करत प्रतिस्पर्ध्यांवर वर्चस्व राखले.
अयान हा व्हिजन अकॅडमीचा खेळाडू असून त्याच्या यशामागे प्रशिक्षक जयेंद्र ढोले, प्रसाद सर, प्रिया मॅडम आणि कुणाल सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.MP Sports Badminton Tournament त्यांच्या प्रशिक्षणामुळे अयानच्या खेळात लक्षणीय प्रगती झाली आहे.अयानच्या या उल्लेखनीय यशाबद्दल त्याचे पालक, प्रशिक्षक आणि क्रीडाप्रेमींनी त्याचे अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
सौजन्य : सागर ताम्हाण,संपर्क मित्र