मुस्लिम तरुणीने आयुषचा केला ‘रहमान’

जिममध्ये झाले धर्मांतर

    दिनांक :08-Jun-2026
Total Views |
लखनौ
Love Jihad गेल्या काही काळामध्ये कथित लव्ह जिहादची अनेक प्रकरणं उघडकीस आली आहे. हिंदू मुलींना लग्नाचं आमिष दाखवून त्यांचं धर्मांतर केल्याच्या काही घटनाही उघडकीस आल्या. मात्र आता एक वेगळाच प्रकार समोर आला आहे. या घटनेत कुठल्या हिंदू तरुणीचं नव्हे तर एका हिंदू तरुणाचं धर्मांतर करण्यात आलं आहे. संबंधित तरुण एका बड्या उद्योगपतीचा मुलगा आहे. त्याला जिम ट्रेनर असलेल्या तरुणीने प्रेमाच्या जाळ्यात ओढून धर्मांतर करायला भाग पाडल्याचा आरोप आहे. या प्रकरणी तरुणीसह तिच्या वडिलांविरोधात गुन्हा दाखल केला असून दोघांना ताब्यात घेतलं आहे.

love jihad 
 
Love Jihad पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना उत्तरप्रदेशातील शामली जिल्ह्यातील आहे. इथं एका करोडपती औषध व्यापाèयाच्या एकुलत्या एक मुलाला महिला जिम ट्रेनरने आधी आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढलं. त्यानंतर त्याचं जबरदस्तीने धर्मांतर करून त्याला वेगळा धर्म स्विकारायला भाग पाडलं. इतकेच नव्हे तर बनावट कागदपत्रांच्या आधारे त्याच्याशी निकाह देखील उरकला. हा प्रकार समोर आल्यानंतर हिंदू संघटनांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
दाढी वाढवून दुकानात बसायचा
Love Jihad पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील दयानंद नगर येथील रहिवासी असलेले देवराज मलिक हे शामली जिल्हा केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष असून ते बडे व्यावसायिक आहेत. त्यांचा 27 वर्षांचा मुलगा आयुष मलिक बी-फार्माचं शिक्षण पूर्ण करून स्वतःचं मेडिकल स्टोअर चालवतो. 5 वर्षांपूर्वी आयुषने ‘कुरैशी प्लस’ नावाच्या जिममध्ये जाणं सुरू केलं होतं. तिथे त्याची 25 वर्षीय जिम ट्रेनर चांदनी कुरैशी हिच्याशी ओळख झाली.
 
 
Love Jihad चांदनीने हळूहळू आयुषला आपल्या जाळ्यात ओढले आणि चार वर्षांपूर्वी छुप्या पद्धतीने त्याचा निकाह करून घेतला. गेल्या 6 महिन्यांपासून आयुषचा पेहराव आणि लूक अचानक बदलला. त्याने दाढी वाढवली, डोक्यावर गोल टोपी आणि कुर्ता-पायजामा घालून तो दुकानात बसू लागला. इतकेच नाही तर तो मशिदीत नमाज पठण करायला जाऊ लागला. याबाबतचे काही फोटो आणि व्हिडिओ देखील समोर आले. आयुषचं नाव बदलून रहमान ठेवण्यात आलं होतं.
Love Jihad हा संपूर्ण प्रकार 4 जून रोजी मुजफ्फरनगरच्या योग साधना आश्रमाचे महंत स्वामी यशवीर यांनी एक व्हिडिओ जारी केल्यानंतर उघडकीस आला. त्यांनी व्हिडिओमध्ये सांगितले की, ’भारत मेडिकल स्टोअर’च्या मालकाच्या मुलाला फसवून त्याचे धर्मांतर करण्यात आले असून संपूर्ण कुटुंबावर दबाव आणला जात आहे. हा व्हिडिओ व्हायरल होताच हिंदू संघटना आक्रमक झाल्या आणि त्यांनी जिम ट्रेनर तरुणीच्या घराबाहेर आंदोलन करण्याची धमकी दिली.
जिम ट्रेनर, सहा कुटुंबीय आणि तीन मौलवींवर एफआयआर
Love Jihad वाढता तणाव पाहता आयुषचे वडील देवराज मलिक यांनी शनिवारी उशिरा शामली पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी जिम ट्रेनर तरुणी चांदनी कुरैशी, तिच्या कुटुंबातील सहा सदस्य आणि तीन मौलवींविरुद्ध जबरदस्तीने धर्मांतर करणे, खंडणी उकळणे आणि जीवे मारण्याची धमकी देणे या कलमांखाली गुन्हा दाखल केला.