गाझियाबाद
Pepsi Sharma काही दिवसांपूर्वी ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूर यांच्या निधनाने संगीतसृष्टी हळहळीत असताना, आता आणखी एका लोकप्रिय तरुण गायकाचे निधन झाले आहे. हरियाणवी लोककलाकार आणि रागिणी गायक पेप्सी शर्मा यांचे निधन झाले आहे.
पेप्सी शर्माचे खरे नाव यशपाल शर्मा असून, रंगमंचावर ते ‘पेप्सी शर्मा’ या नावाने ओळखले जात. गाझियाबादमधील पाटला गावातील रहिवासी असलेल्या पेप्सी शर्माने हरियाणा, उत्तर प्रदेश आणि दिल्ली-एनसीआरमधील रंगमंचीय सादरीकरणातून स्वतःस एक विशेष स्थान मिळवले होते. हरियाण्यातील गोशाळांमध्ये आयोजित होणाऱ्या रागिणी स्पर्धांमध्ये त्याने प्रमुख भूमिका बजावली, तसेच आपल्या प्रेक्षकांशी जोडण्याच्या अद्वितीय शैलीसाठीही त्याला ओळखले जात असे.
ते फक्त एक गायक नव्हते , Pepsi Sharma तर रंगमंचावरील त्याची विनोदी शैली आणि अचूक टायमिंगही प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय ठरत होती. रागिणी शोमधील सादरीकरणादरम्यान प्रेक्षकांना हसवण्याची आणि त्यांचे मनोरंजन करण्याची त्याच्याकडे एक अद्वितीय क्षमता होती. त्याने प्रसिद्ध हरियाणवी कलाकार सपना चौधरी सोबत अनेक वेळा सादरीकरण केले, एकदा तर त्याने तिला नागिन डान्समध्ये मात दिल्याची आठवणही प्रेक्षकांच्या स्मृतीत आहे.
पेप्सी शर्मा याच्या छातीत अचानक दुखू लागल्याने त्यांना एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यानच त्यांचा मृत्यू झाला, असे त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितले. पेप्सी शर्माला 10 वर्षांची मुलगी आणि 7 वर्षांचा मुलगा आहे.त्यांचे आकस्मिक निधन हरियाणवी आणि दिल्ली-एनसीआरमधील रंगमंचीय व संगीतप्रेमींमध्ये हळहळ निर्माण करणारे ठरले आहे. संगीतविश्वाने एका तरुण, प्रतिभावान आणि प्रेक्षकांच्या हृदयात स्थान निर्माण केलेल्या कलाकाराला गमावले आहे. त्यांच्या असंख्य चाहत्यांमध्ये या दुःखद घडामोडीमुळे शोककळा पसरली आहे.