कारंजा लाड
stormy Winds Karanja Lad जोरदार पाऊस, वादळ आणि वेगवान वार्यामुळे पिंपळगाव बु. परिसरातील वीज यंत्रणेला मोठा फटका बसला असून, कृषी वीजपुरवठा करणार्या वीजवाहिनीचे अनेक विद्युत खांब जमिनदोस्त झाले आहेत. या घटनेमुळे शेतकर्यांच्या सिंचन व्यवस्थेवर गंभीर परिणाम झाला असून, पिकांना वेळेवर पाणी देणे अशय झाल्याने शेतकरी चिंतेत सापडले आहेत.
stormy Winds Karanja Lad एकीकडे वादळामुळे शेतीचे नुकसान झाले असताना दुसरीकडे वीजपुरवठा खंडित झाल्याने ग्रामीण भागातील नागरिक आणि शेतकरी दुहेरी संकटाचा सामना करत आहेत. सध्या खरीप हंगामाच्या तयारीला वेग आला असून, अनेक शेतकरी पेरणीपूर्व मशागतीसह सिंचनाच्या कामात व्यस्त आहेत. अशा परिस्थितीत कृषी मोटारपंपांना वीजपुरवठा करणार्या लाईनचे खांब कोसळल्याने शेतकर्यांची मोठी अडचण निर्माण झाली आहे. पाण्याअभावी पिकांच्या वाढीवर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात असून, ऐन हंगामात निर्माण झालेल्या या समस्येमुळे शेतकर्यांचे आर्थिक गणितही बिघडण्याची शयता आहे. वादळाच्या तडाख्यातून गाव अद्याप सावरलेले नसतानाच आणखी एक गंभीर समस्या समोर आली आहे.
stormy Winds Karanja Lad गावातील विद्युत वाहिनीच्या डीपीमधून (ट्रान्सफॉर्मर) मोठ्या प्रमाणात तेलगळती सुरू असल्याचे ग्रामस्थांच्या निदर्शनास आले आहे. ट्रान्सफॉर्मरमधील तेल सतत गळत असल्याने तो कधीही निकामी होऊ शकतो, अशी भीती व्यक्त केली जात आहे. ही स्थिती कायम राहिल्यास संपूर्ण गावाचा वीजपुरवठा खंडित होण्याचा धोका निर्माण झाला असून, नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. विशेष म्हणजे, डीपीतील तेलगळतीमुळे केवळ वीजपुरवठ्याचाच प्रश्न निर्माण झालेला नाही, तर सुरक्षिततेचाही मुद्दा ऐरणीवर आला आहे.
stormy Winds Karanja Lad महावितरण प्रशासनाने युद्धपातळीवर दुरुस्ती मोहीम राबवून कोसळलेले वीज खांब तातडीने उभारावेत, कृषी वीजपुरवठा सुरळीत करावा तसेच डीपीतील तेलगळती थांबवून ट्रान्सफॉर्मरची आवश्यक दुरुस्ती करावी, अशी जोरदार केली आहे. अन्यथा आगामी काळात शेतीसह गावाच्या दैनंदिन जीवनावर गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
दुरुस्तीची मागणी
या समस्याबाबत संबंधित विभागाला वारंवार माहिती देण्यात आली आहे. मात्र, अद्याप कोणतीही प्रभावी कार्यवाही झालेली नसल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. या प्रकारामुळे ग्रामीण भागातील वीज यंत्रणेची दुरवस्था पुन्हा एकदा समोर आली असून, नैसर्गिक आपत्तीच्या काळात प्रशासनाच्या तत्परतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.त्यामुळे तातडीने दुरुस्ती करून वीजपुरवठा सुरु करावा अशी मागणी केल्या जात आहे.