बळीराजा हंगामपूर्व मशागतीच्या कामात व्यस्त

    दिनांक :08-Jun-2026
Total Views |
राळेगाव,
Pre-sowing activities for farmers जिल्ह्यात दिवसा सूर्य आग ओकत आहे, तर संध्याकाळी वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचे वातावरण निर्माण होते आहे. भरदुपारी उन्हात घराबाहेर निघणे कठीण आहे. दुसरीकडे लग्नसराई धूमधडाक्यात सुरू आहे. मात्र, शेतीची कामे आपल्यालाच करावी लागणार, यासाठी उद्याचे स्वप्न डोळ्यांत साठवून जगाचा पोशिंदा शेतकरी रखरखत्या उन्हाचा पारा अंगावर झेलत येणाèया खरीपातील पेरणीसाठी मशागतीच्या कामात व्यस्त दिसत आहे.
 
 
shetkari
 
यावर्षी सुरवातीलाच तापमानात प्रचंड वाढ झाली आहे. एप्रिल महिन्यात तर घामाच्या धारा झेलत शेतकरी कामात गुंतले होते. मे महिन्यांत उष्णतेबरोबर संध्याकाळी ढगाळ वातावरण निर्माण होऊन वादळी वारे व पावसाच्या सरीने उष्णतेत वाढ होत आहे. त्यामुळे शेतकरी रखरखत्या उन्हात व वादळी वाèयाचा मारा सोसत पेरणीपूर्व मशागत कामे करण्यात व्यस्त आहे. गतवर्षी झालेल्या अतिवृष्टी तसेच नैसर्गिक संकटांमुळे उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली, वार्षिक बजेटही कोलमडले. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. निसर्ग, उत्पन्न व शासनाच्या धोरणावर शेतकèयांची मदार असलेल्या शेतीचे दिवस संपले आहेत. निसर्ग साथ देत नाही. उत्पादनात कमालीची घट होत आहे. त्याचबरोबर उत्पन्नाला योग्य दर मिळत नसल्याने शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे.
 
 
Pre-sowing activities for farmers  तीव्र उन्हामुळे मजूर मिळेनासे झाले आहेत. त्यामुळे शेतमजुरांना मोठा भाव आला आहे. ट्रॅक्टरने शेतीची मशागत करणे परवडेनासे झाले आहे. त्यामुळे शेतकèयांपुढे अडचण निर्माण झाली आहे. यंदा उत्पादन कमी, शेतमालाला भाव कमी अशी शेतकèयांची अवस्था झाली आहे. उत्पादन खर्च वाढला, त्या तुलनेत यंदा शेतमालाचे दर पडल्याने शेतकèयांच्या पदरी निराशा आली आहे. त्यामुळे शेतकरी कर्जबाजारी झाले आहेत. परंतु, हार न मानता पुन्हा बळीराजा नव्या उमेदीने शेती करायला तयार झाला आहे.