पुणे
railway mega block मिरज रेल्वे मार्गावरील दुहेरीकरणाच्या कामाला गती देण्यासाठी नीरा यार्ड येथे इंटरलॉकिंगचे अत्यावश्यक काम हाती घेण्यात आले आहे. या कामामुळे 6 जून ते 25 जून या कालावधीत तब्बल 21 दिवसांचा मेगाब्लॉक घेण्यात आला असून, त्याचा मोठा परिणाम या मार्गावरील रेल्वे वाहतुकीवर होत आहे. या काळात काही गाड्या अंशतः रद्द करण्यात आल्या आहेत, तर काही गाड्यांचे मार्ग व वेळापत्रक बदलण्यात आले आहे. त्यामुळे प्रवाशांना विलंब व गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.
रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार कोल्हापूर–पुणे डेमू (11426) ही गाडी 9, 16, 22 आणि 23 जून रोजी केवळ सातारा स्थानकापर्यंतच धावणार आहे. तर 19 आणि 25 जून रोजी ही सेवा लोणंदपर्यंत मर्यादित ठेवण्यात आली आहे. त्याचप्रमाणे पुणे–कोल्हापूर डेमू (11425) 9 ते 24 जूनदरम्यान सातारा येथूनच सुटणार असून 19 व 25 जून रोजी ती लोणंद स्थानकावरून चालवण्यात येणार आहे.याशिवाय बिकानेर–मिरज एक्सप्रेस (20475) 15 जून रोजी खडकीपर्यंतच धावेल, तर मिरज–बिकानेर एक्सप्रेस (20476) 16 जून रोजी खडकी येथूनच सुटेल. हुबळी–पुणे वंदे भारत एक्सप्रेस (20669) आणि पुणे–कोल्हापूर वंदे भारत एक्सप्रेस (20674) यांच्याही वेळापत्रकात 19 जून रोजी बदल करण्यात आले असून काही सेवा सातारा स्थानकापर्यंतच मर्यादित राहणार आहेत.
दरम्यान, काही railway mega block गाड्यांना पर्यायी मार्ग देण्यात आले आहेत. 24 जून रोजी निजामुद्दीन–वास्को एक्सप्रेस (12780) ही गाडी मनमाड–दौंड–कुर्डुवाडी–मिरज असा वळवून चालवण्यात येणार आहे. तसेच 20 जून रोजी कोल्हापूर–पुणे डेमू सुमारे दोन तास उशिराने धावणार असून, 21 जून रोजी निजामुद्दीन एक्सप्रेसला सुमारे दीड तासांहून अधिक विलंब होणार आहे. 25 जून रोजी कोल्हापूर–गोंदिया एक्सप्रेसलाही सुमारे दोन तासांचा उशीर अपेक्षित आहे.या कालावधीत दररोज तीन ते चार तासांचा मेगाब्लॉक घेण्यात येत असल्याने बंगळूर–गांधीधाम, बंगळूर–एलटीटी, अहमदाबाद–कोल्हापूर, म्हैसूर–अजमेर, बंगळूर–जोधपूर आणि कोल्हापूर–सीएसएमटी यांसारख्या अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या विविध स्थानकांवर 15 मिनिटांपासून ते अडीच तासांपर्यंत थांबवण्यात येत आहेत.
रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना railway mega block आवाहन केले आहे की, प्रवास सुरू करण्यापूर्वी संबंधित गाड्यांचे अद्ययावत वेळापत्रक तपासूनच प्रवासाचे नियोजन करावे, जेणेकरून अनावश्यक गैरसोय टाळता येईल.