रिसोड पोलिसांनी चार तासात लावला चोरीचा छडा

आरोपी अटकेत, ई-स्कूटी जप्त

    दिनांक :08-Jun-2026
Total Views |
रिसोड, 
risod-police-solve-theft-case : शहरातून चोरीस गेलेल्या इलेट्रिक स्कूटीचा शोध अवघ्या चार तासात लावून रिसोड पोलिसांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. या प्रकरणात एका आरोपीला अटक करण्यात आली असून चोरीस गेलेली सुमारे ४६ हजार रुपये किमतीची ई-स्कूटी जप्त करण्यात आली आहे.
 
 
 
washim
 
 
 
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सातरकर नगर येथील रहिवासी अनिता दीपक सोळंके यांनी ४ जून रोजी रिसोड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांनी आपल्या घरासमोर उभी केलेली इलेट्रिक स्कूटी २ जून रोजी सकाळी चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. परिसरात शोध घेऊनही स्कूटी न मिळाल्याने त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली. तक्रार दाखल होताच पोलिस निरीक्षक रामेश्वर चव्हाण यांनी तपास पथकाला तत्काळ सूचना दिल्या. गोपनीय माहितीदारांच्या मदतीने पोलिसांनी संशयिताचा शोध घेतला. तपासादरम्यान अरविंद भीमराव जुमडे (वय ३०) , रा. पंचशील नगर, रिसोड याला ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्याच्याकडून चोरीस गेलेली इलेट्रिक स्कूटी हस्तगत करण्यात आली.
 
 
सदर कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक निकेश खाटमोडे, अपर पोलिस अधीक्षक लता फड व उपविभागीय पोलिस अधिकारी नवदीप अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. तपास पथकातील अधिकारी व कर्मचार्‍यांनी या यशस्वी कारवाईत महत्त्वाची भूमिका बजावली.