रिसोड
rain hit Risod शहरामध्ये ८ जून रोजी दुपारी ३ वाजता च्या दरम्यान वादळवारा, विजांच्या कडकडासह अचानक पावसाला सुरुवात झाल्याने नागरिकांची तारांबळ उडाली.
rain hit Risod शहरात दुपारपासून ढगाळ वातावरण होते. दुपारी ३ वाजता च्या दरम्यान अचानक सुसाट्याचा वारा सुटून विजांच्या कडकडसह पावसाला सुरुवात झाल्याने नागरिकांची एकच धांदल उडाली. छोटे व्यापारी, हातगाडीवाले यांना आपला माल झाकण्यासाठी तारांबळ उडाली. रस्त्यावरील नागरिकांनी पावसापासून संरक्षण करण्यासाठी दुकानाचा आश्रय घेतला.
rain hit Risod कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतमाल विक्री साठी हळद या शेतमालाचा दिवस होता. अनेक शेतकर्यांनी रस्त्यावर हळदीचे ढीग टाकल्याने अचानक आलेल्या पावसाने हळद झाकण्यासाठी त्यांची धांदल उडाली. वरून जरी ताडपत्रीने हळद झाकलेली असली तरी रस्त्यावरील पाणी हळदीच्या ढिगाच्या खाली घुसल्याने शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले. व्यापाराचा माल ओठ्यावर आणि शेतकर्यांचा माल रस्त्यावर ही बाजार समितीची कार्यपद्धती असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले. शेतकर्यांचा वाली कोण असा प्रश्न सर्वसामान्य शेतकरी विचारत आहेत