नपच्या शाळांमध्ये घ्या प्रवेश! नगराध्यक्ष पांगुळ यांचे भावनिक आवाहन

    दिनांक :08-Jun-2026
Total Views |
वर्धा, 
sudhir-pangul : शाळा फत रंगवल्या नाहीत, तर मुलांच्या उज्ज्वल भवितव्याची स्वप्ने रंगवली आहेत. शहरातील शिक्षण क्षेत्रात एक सकारात्मक आणि प्रेरणादायी परिवर्तन घडत आहे. नगराध्यक्ष सुधीर पांगूळ यांच्या नेतृत्वाखाली नगरपरिषद शाळांचा संपूर्ण कायापालट करण्यात आला आहे. नव्या उत्साहात आणि आधुनिक सुविधांसह विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी सज्ज झाल्या असून नगराध्यक्ष सुधीर पांगुळ यांनी स्वत: विद्यार्थ्यांच्या घरोघरी जाऊन नपच्या शाळांमध्ये प्रवेशासाठी भावनिक आवाहन केले आहे.
 
 
k
 
 
 
वर्षानुवर्षे दुर्लक्षित राहिलेल्या नगरपरिषद शाळांना पुनर्जीवित करण्याचे मोठे काम नगराध्यक्ष पांगुळ यांनी हाती घेतले. शाळांची आकर्षक रंगरंगोटी, स्वच्छ व सुरक्षित परिसर, आवश्यक भौतिक सुविधा, गुणवत्तापूर्ण शिक्षकांची उपलब्धता, विद्यार्थ्यांसाठी पोषक वातावरण आणि शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी आवश्यक असलेल्या विविध उपाययोजना यामुळे नगरपरिषद शाळांचे चित्र पूर्णपणे बदलले आहे. शहरातील विविध भागात, वस्त्यांमध्ये, घराघरात जाऊन पालकांशी संवाद साधत आहेत. आपल्या मुलांच्या भवितव्यासाठी नगरपरिषद शाळांचा पर्याय निवडण्याचे आवाहन करत आहेत.
 
 
नगरपरिषद शाळा सक्षम आहेत. आपल्या मुलांना दर्जेदार शिक्षण देण्याची जबाबदारी आम्ही स्वीकारली आहे, असा विश्वास नगराध्यक्ष पांगुळ यांनी व्यत केला. शहरातील एकही मूल शिक्षणापासून वंचित राहणार नाही, असा निर्धार नगराध्यक्ष सुधीर पांगुळ यांनी व्यत केला आहे.