गडचिरोली,
world-environment-day : लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडद्वारे संचालित सुरजागड खाणीत जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला. पर्यावरण संवर्धन, शाश्वत जीवनशैली आणि निसर्गाप्रती सामूहिक जबाबदारी याबाबत जनजागृती करण्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात चित्रकला स्पर्धेने झाली. या स्पर्धेत कर्मचार्यांनी कचरा कमी करणे, पर्यावरण संरक्षण आणि शाश्वत विकास या विषयांवर आधारित आपल्या कल्पकतेचे दर्शन घडविले. स्वच्छ, हिरवेगार आणि पर्यावरणपूरक भविष्यासाठीची आपली दृष्टी व्यक्त करण्यासाठी या स्पर्धेने सहभागींसाठी प्रभावी व्यासपीठ उपलब्ध करून दिले. यासोबतच जागरूकता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
यामध्ये यंदाच्या जागतिक पर्यावरण दिनाच्या संकल्पनेचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले तसेच पर्यावरण संवर्धनासाठी प्रत्यक्ष कृती करण्याचे आवाहन करण्यात आले. कार्यस्थळी आणि दैनंदिन जीवनात शाश्वत व पर्यावरणपूरक सवयी अंगीकारण्याच्या गरजेवर विशेष भर देण्यात आला.
उपक्रमाचा एक भाग म्हणून कर्मचार्यांनी मिशन लाइफ प्रतिज्ञा घेत पर्यावरणपूरक जीवनशैली स्वीकारण्याचा निर्धार व्यक्त केला. या उपक्रमाचा उद्देश पर्यावरणाबाबत अधिक जागरूकता निर्माण करणे आणि दीर्घकालीन सकारात्मक वर्तनात्मक बदलांना प्रोत्साहन देणे हा होता.
पर्यावरण संवर्धनावरील आपली बांधिलकी अधिक दृढ करत, सुरजागड खाणीत राष्ट्रीय अभियान ‘एक पेड़ मा ँके नाम’ 2026-27 अंतर्गत वृक्षारोपण मोहीम राबविण्यात आली. कर्मचार्यांनी उत्साहाने खाण परिसरात रोपांची लागवड केली. ही कृती नैसर्गिक संसाधनांचे संवर्धन आणि भावी पिढ्यांसाठी निरोगी व हरित पर्यावरण निर्माण करण्याच्या वचनबद्धतेचे प्रतीक ठरली.
हे सर्व उपक्रम लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक बी. प्रभाकरन यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वाचे आणि मार्गदर्शनाचे प्रतीक आहेत. त्यांनी औद्योगिक क्षेत्रात हरित उपक्रम आणि शाश्वत विकासाला सातत्याने प्रोत्साहन दिले आहे. पर्यावरण संवर्धनाविषयीची त्यांची दृढ बांधिलकी कंपनीला जबाबदार खाणकाम, जैवविविधता संवर्धन आणि दीर्घकालीन शाश्वत विकासाच्या दिशेने प्रेरित करत आहे.
यावेळी कंपनीच्या प्रतिनिधींनी सांगितले की, पर्यावरणीय जबाबदारी ही लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडच्या कार्यसंस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. शाश्वत विकास, कर्मचारी सहभाग आणि पर्यावरण संवर्धनासाठी सातत्याने राबविल्या जाणार्या उपक्रमांद्वारे कंपनी देशाच्या औद्योगिक प्रगतीमध्ये योगदान देत सकारात्मक सामाजिक व पर्यावरणीय प्रभाव निर्माण करण्यासाठी कटिबद्ध आहे, असे सांगीतले.