भारत स्वाभिमान न्यास सुयोगनगर उद्यान
Suyognagar Park Cleanliness Campaign दै. तरुण भारत आणि नागपूर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित स्वच्छता आभियानात भारत स्वाभिमान न्यास, नागपूर जिल्हा, पतंजली योग परिवार आणि जिव्हाळा ज्येष्ठ नागरिक मंडळाने उत्स्फूर्त सहभाग घेत सुयोगनगर येथील उद्यान आणि परिसर स्वच्छ केला. यात नगरसेविका विशाखा मोहोड, डॉ. अविनाश कोकाटे, रामाप्रसाद पाराशर, आसाराम महामूर्ती, अशोक क्षीरसागर, बालाजी पावडे, शोभा शर्मा, किरण बुरसे, सुनील गव्हाणे, राजेश उमाटे यासह इतरही नागरिक सहभागी झाले होते.
हनुमान मंदिर कर्मचारी वसाहत महाराजबाग
कर्मचारी वसाहत महाराजबाग येथील गोपाल मेहाडिया यांनी बांधलेल्या हनुमान मंदिरात स्वच्छताप्रमींनी तरुण भारत आणि नागपूर महानगरपालिका यांनी राबविलेल्या मंदिर स्वच्छता उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. यात शारदा त्रिवेदी, सुनील नरखेडे, राजू भोतमांगे, मनीष सराफ, हेमंत वासू आणि सफाई कर्मचारी राऊत यांच्यासह इतरही नागरिकांनी सहभाग घेत मंदिर परिसर स्वच्छ केला.
हनुमान मंदिर पांडे ले आऊट
दै. तरुण भारत आणि नागपूर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित स्वच्छता आभियानांतर्गत पांडे ले-आऊट येथील नागरिकांनी हनुमान मंदिर परिसर आणि उद्यानाची स्वच्छता केली. यात नागपूर महानगर पर्यावरण गतिविधि प्रमुख नेताजी चिंचुळकर, सोमलवाडा भाग पर्यावरण गतिविधि संयोजक नरेश हिवरखेडकर, नागपूर महानगर समिती संपर्कप्रमुख वसुधा खटी यांच्यासह हिमांशू उमाळकर, भूषण वझलवार, अजित पर्वते, अभय आंबेकर, संजय पाठक, सुरेश माथाडे, किरण पत्की, मुकुंद चन्ने, रघुनाथ देशपांडे यासह इतरही नागरिक सहभागी झाले होते.