नागपूर, (रामटेक)
Tai Golwalkar College ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना तांत्रिक शिक्षण, कौशल्य विकास आणि रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी ताई गोळवलकर महाविद्यालय (रामटेक) आणि इंडियन कौन्सिल फॉर टेक्निकल रिसर्च अँड डेव्हलपमेंट (ICTRD), नागपूर यांच्यात सामंजस्य करार (MoU) करण्यात आला.
नवीन शैक्षणिक धोरण (NEP 2020) अंतर्गत करण्यात आलेल्या या करारानुसार महाविद्यालयात ‘प्रज्ञानेट योजना’ अंतर्गत स्टुडंट चॅप्टर सुरू करण्यात येणार आहे.Tai Golwalkar College यामुळे विद्यार्थ्यांना तांत्रिक प्रशिक्षण, कार्यशाळा, इंटर्नशिप, प्रमाणपत्र अभ्यासक्रम तसेच उद्योजकता विकास, स्टार्टअप संस्कृती आणि डिजिटल ट्रान्सफॉर्मेशनबाबत तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळणार आहे.या करारावर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेश गादेवार आणि ICTRD चे सदस्य सचिव डॉ. केतन मोहितकर यांनी स्वाक्षऱ्या केल्या.ग्रामीण विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला योग्य दिशा देऊन त्यांना जागतिक स्तरावरील संधींसाठी सक्षम करण्यास हा करार उपयुक्त ठरेल, असा विश्वास प्राचार्य डॉ. गादेवार यांनी व्यक्त केला. या उपक्रमाचे विद्यार्थी व पालकांकडून स्वागत करण्यात येत आहे.
सौजन्य: सारंग पांडे संपर्क मित्र