नागपूर
Teachers Association, Marathi शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय प्रतिपूर्तीसाठी आभा कार्डची सक्ती करू नये तसेच समस्या सुटेपर्यंत पाच लाख रुपयांपर्यंतची वैद्यकीय देयके पूर्ववत मंजूर करावीत, अशी मागणी विदर्भ प्राथमिक माध्यमिक शिक्षक संघातर्फे करण्यात आली आहे.
संघाचे संस्थापक अध्यक्ष मिलिंद वानखेडे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने यासंदर्भातील निवेदन माध्यमिक शिक्षणाधिकारी अनिल दहिफळे यांना सादर केले. Teachers Association, Marathi आभा योजनेत सर्व खासगी रुग्णालयांचा समावेश नसल्याने शिक्षकांना अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.या मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिक्षणमंत्री दादाजी भुसे, आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्यासह संबंधित अधिकाऱ्यांना पाठविण्यात आले आहे.
सौजन्य: अंशुल जिचकार,संपर्क मित्र