जिव्हाळा महिला मंडळाचा स्वच्छतेसाठी पुढाकार

    दिनांक :08-Jun-2026
Total Views |
नागपूर,
jiwala-mahila-mandal : नागपूर महानगरपालिका आणि दैनिक तरुण भारत यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येत असलेल्या उद्यान स्वच्छता मोहिमेअंतर्गत सुयोग नगर येथील महात्मा फुले उद्यानात आज सकाळी स्वच्छता अभियान उत्साहात पार पडले. या उपक्रमात जिव्हाळा महिला मंडळ आणि योगा ग्रुप यांच्या सदस्यांनी सकाळी ७.३० वाजता एकत्र येत उद्यानाच्या आतील तसेच बाहेरील परिसराची स्वच्छता केली.
 
 
jiwala-mahila-mandal
 
 
यावेळी प्रभागाच्या नगरसेविका विशाखा मोहोड यांनी उपस्थित राहून मोहिमेत सहभाग घेतला. तसेच योगा ग्रुपचे प्रमुख अविनाश कोकाटे व त्यांच्या सहकाऱ्यांनीही स्वच्छता अभियानासाठी मोलाचे सहकार्य केले.
 
जिव्हाळा महिला मंडळाच्या पदाधिकारी आणि सदस्यांनी ड्रेस कोडमध्ये उपस्थित राहून उपक्रमात उत्साहाने सहभाग नोंदविला. विशेष म्हणजे या मोहिमेत महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.
 
कार्यक्रमाच्या शेवटी जिव्हाळा महिला मंडळाच्या अध्यक्षा माधवी रागिणवार यांनी उपस्थित नागरिक, महिला सदस्य तसेच नागपूर मनपाच्या स्वच्छता विभागातील कर्मचाऱ्यांचे आभार मानले.