विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसरात स्वच्छता अभियान

    दिनांक :08-Jun-2026
Total Views |

डिसेंडरट ४ ६
 
 
वर्धा रोडवरील स्नेहनगर येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसरात स्वच्छता अभियान उत्साहात राबविण्यात आले. परिसर स्वच्छ व सुंदर ठेवण्याच्या उद्देशाने आयोजित या उपक्रमात स्थानिक नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. या अभियानात नगरसेवक अमोल शामकुळे, वैभव दांडेकर, संजय डाबळी, आशिष नाईक, मिलिंद खानखोजे, संदीप पाटील, मायताई हाडे, ईश्वर ढेंगडे, दुर्वेश मेहर, चेतन दांडेकर आणि अविनाश चांगडे यांनी श्रमदान करून परिसर स्वच्छतेचा संदेश दिला. उपस्थितांनी मंदिर परिसरातील कचरा संकलित करून स्वच्छता राखण्याचा संकल्प केला. यावेळी नागरिकांनी नियमित स्वच्छतेसह पर्यावरण संवर्धनासाठीही सहकार्य करण्याचे आवाहन केले.