वर्धा,
cycle-rally : जागतिक सायकल दिनाच्या निमित्ताने आज ७ रोजी सकाळी ५.३० वाजता वर्धा सायकलिस्ट क्लबतर्फे शहरात सायकल रॅली काढण्यात आली. रॅलीत शहरातील अनेक सायकलप्रेमींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. सायकलिंगद्वारे निरोगी जीवनशैलीचा प्रसार करणे, पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणे आणि नागरिकांमध्ये आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करणे हा या रॅलीमागील प्रमुख उद्देश होता. सहभागी सदस्यांनी शिस्तबद्ध व उत्साही वातावरणात रॅली यशस्वीपणे पूर्ण केली.
यशस्वीतेसाठी वर्धा सायकलिस्ट लब परिवारातील मोहन गलांडे व प्रसाद सोईतकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले. यावेळी चला, निरोगी जीवनशैलीचा संदेश अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवूया आणि सायकलिंगची प्रेरणा प्रत्येक घरात निर्माण करूया, असे आवाहन केले.