विदर्भातील सर्व शाळा 26 जूनला सुरू करा
शिक्षक संघटना समन्वय महासंघाची मागणी
यवतमाळ,
Yavatmal Zilla Parishad Teachers' Association यवतमाळ जिल्हा परिषद अंतर्गत शिक्षकांच्या विविध समस्या निकाली काढाव्या. यासाठी यवतमाळ जिल्हा परिषद शिक्षक संघटना समन्वय महासंघाने राज्याचे शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रतापसिंह यांची 2 जून 2026 ला भेट घेतली. ते यवतमाळ दौèयावर आले असता जिप शिक्षक संघटना समन्वय महासंघाने त्यांचे स्वागत करून शिक्षकांच्या प्रलंबित समस्यांचे निवेदन त्यांना सादर केले. या प्रसंगी जिल्हाधिकारी विकास मीना यांची उपस्थिती होती. या मागण्यांमध्ये उच्च न्यायालयाच्या 8 मे 2026 च्या निर्णयाला अधीन राहून जिल्ह्यातील सरसकट विषय शिक्षकांना वेतन वेतनश्रेणीसह थकबाकी देण्यात यावी. 14 मे 2026 चे शिक्षण संचालकांचे पत्र रद्द करून टीईटी, सीटीईटी पात्रताधारक शिक्षकांच्या शिक्षकांना सेवाज्येष्ठतेनुसार पदोन्नती देण्यात यावी, यांचा समावेश होता.
Yavatmal Zilla Parishad Teachers' Association तसेच विदर्भातील तापमानाचा विचार करता संपूर्ण विदर्भातील शाळा 26 जूनला सुरू कराव्या. उच्च श्रेणी मुख्याध्यापकांना संबंधित कालावधीतील रजा रोखीकरण देण्यात यावे. जिल्ह्यातील उर्दू शाळांची संख्या लक्षात घेता उर्दू शिक्षकांमधून केंद्रप्रमुख पदोन्नती करावी. जिप शाळेचे विद्युत बिल ग्रामपंचायतने भरावे, याही मागण्या यावेळी करण्यात आल्या. सोबतच यवतमाळ जिप अंतर्गत मराठी, उर्दू पवित्र पोर्टल शिक्षकांची रिक्त पदे दाखविण्यात यावी. कार्यरत शिक्षकांचे स्थायित्व प्रमाणपत्र प्रस्ताव व मराठी, हिंदी भाषा सवलत प्रकरण त्वरित निकाली काढावे, अशाही मागण्यांचे निवेदन शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रतापसिंह यांना देण्यात आले. निवेदन देतेवेळी शिक्षक संघटना समन्वय महासंघाचे निमंत्रक किरण मानकर, आसाराम चव्हाण, नदीम पटेल, राजहंस मेंढे, डॉ. संदीप तंबाखे, डॉ. तुषार आत्राम, महंमद रफीक, मनहर्ष नागतोडे, जाकीर हुसेन, पुंडलिक बुटले यांची उपस्थिती होती.