वर्धा,
wardha-news : शेतात काम सुरू असताना ट्रॅटरच्या मागील बाजूस उभा असलेला राकेश शियाग (२३) युवक अचानक तोल जाऊन खाली पडला आणि रोटाव्हेटरमध्ये अडकला. ट्रॅटरने त्याला शेताच्या बांधापर्यंत फरफटत नेल्याने त्याचा मृत्यू झाला. ही घटना वर्धा तालुयातील मांडवा येथे आज ८ रोजी घडली. असे मृताचे नाव आहे. तो मोबाईल पाहत असताना त्याचा तोल गेल्या. जमिनीवर पडला, रोटाव्हेटरमध्ये अडकून त्याचा मृत्यू झाल्याचे आतापर्यंतच्या पोलिसांच्या चौकशीत पुढे आले आहे.

मांडवा येथील सुरेश शियाग (३३) हे ट्रॅटर चालक म्हणून काम करतात. त्यांच्यासोबत राकेशही काम करत होता. ७ जून रोजी सकाळी सुरेश आणि राकेश ट्रॅटर व रोटाव्हेटर घेऊन राजू लोणकर यांच्या ठेयाने केलेल्या शेतात गेले होते. शेतात रोटाव्हेटर फिरविण्याचे काम सुरू असताना राकेश ट्रॅटरच्या मागील भागावर बसून मोबाईल पाहत होता. त्याचा तोल गेला आणि तो रोटाव्हेटरमध्ये अडकला. अचानक आवाज ऐकून सुरेश यांनी ट्रॅटर थांबवण्याचा प्रयत्न केला आणि खाली उतरले. मात्र, तोपर्यंत राकेश रोटाव्हेटरमध्ये गंभीररीत्या अडकला होता. ट्रॅटर सुरू असल्याने तो शेताच्या बांधापर्यंत फरफटत गेला. या अपघातात त्याच्या दोन्ही पायांना, छातीला आणि चेहर्यावर गंभीर दुखापती झाली. सावंगी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असता तपासणीअंती डॉटरांनी त्याला मृत घोषित केले.