कार व मालवाहकची समोरासमोर धडक

    दिनांक :09-Jun-2026
Total Views |
- गोंदिया-तुमसर मार्गावरील घटना : एकाचा मृत्यू,पाच जखमी

गोंदिया, 
Accident on the Gondia-Tumsar road कार व मालवाहक वाहनात समोरासमोर झालेल्या धडकेत कारमधील एका युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर पाच जण जखमी झाल्याची घटना सोमवारी दुपारी साडेचार वाजताच्या सुमारास तिरोडा तालुक्यातील सारंडी येथे गोंदिया-तुमसर राष्ट्रीय राज्यमहामार्गावर घडली. अजित चव्हाण (34) रा. सेलटॅक्स कॉलोनी, गोंदिया असे मृत युवकाचे नाव आहे.
 
 
apghat

apghat
 
मिळालेल्या माहितीनुसार मृत अजित व त्याचे मित्र कार क्रमांक एमएच 43 बीजी 9048 ने तुमसरकडून गोंदियाच्या दिशेने भरधाव वेगात येत असताना सरांडी गावाजवळ चालकाचा कारच्या स्टेअरींगवरून नियंत्रण सुटला. यावेळी समोरून येत असलेल्या मालवाहक क्रमांक एमच 35 ए जे 2983 ला कारची धडक बसली. ज्यामध्ये कारमध्ये समोर बसलेला अजित चव्हाण याचेसह चालक राम म्हात्रे (24) रा. कन्हारटोली, दमण रा. गणेशनगर, व गौरव रा. बालाघाट, तर मालवाहक वाहनाचा चालक आकाश प्रकाश मेश्राम (24) रा. मुंडीकोटा, सुनीता मदन कांबळे (54) रा. भीमनगर/घोगरा जखमी झाले. यात अजित व त्याचे मित्र गंभीर जखमी झाल्याने त्यांना गोंदिया येथील खासगी रुग्णालयात भर्ती करण्यात आले. दरम्यान, मंगळवारी 9 जून रोजी सकाळी 8 वाजताच्या सुमारास उपचारादरम्यान अजितचा मृत्यू झाला. या अपघातात कार व मालवाहक वाहनाच्या समोरील भागाचा पुर्णतः चेंदामेंदा झाला. याप्रकरणी तिरोडा पोलिसांनी घटनेची नोंद केली असून सुनीता कांबळे यांनी कारचालकाच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे.