दुचाकींची समोरासमोर धडक; तिघांचा मृत्यू

    दिनांक :09-Jun-2026
Total Views |
पुलगाव-आर्वी मार्गावरील समृद्धी महामार्गाच्या पुलाखाली भीषण अपघात
 
पुलगाव, 
Accident on the Pulgaon-Arvi road पुलगाव-आर्वी मार्गावरील समृद्धी महामार्गाच्या पुलाखाली मंगळवार ९ रोजी दुपारी २.३० ते ३ वाजताच्या सुमारास दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाली. या भीषण अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला. योगेश रामकृष्ण मेश्राम रा. सालफळ, देवेंद्र त्र्यंबक दरणे रा. दरणे टाकळी आणि गंगाधर पंढरीनाथ दरणे रा. दरणे टाकळी अशी मृतकांची नावे आहेत.
 
 
accdkso
 
मिळालेल्या माहितीनुसार, विरूळ-समुद्री अडंरपास जवळ एम. एच. ४० बी. यू. २२७४ क्रमांकाची पल्सर आणि एम. एच. ३२ ए. व्ही. ८४५५ क्रमांकाची फॅशन (प्रो) यांच्यात समृद्धी पुलाखाली समोरासमोर भीषण धडक झाली. दोन्ही दुचाकींचा वेग अधिक असल्याने अपघात घडताच मोठे नुकसान झाले आहे. यात योगेश मेश्राम, देवेंद्र दरणे आणि गंगाधर दरणे या तिघांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच पुलगावचे पोलिस पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवले.