कलपाथरीतील आगीत सर्वस्व जळालेल्यांना भाजयुमोचा आधार

    दिनांक :09-Jun-2026
Total Views |
- पिडीत कुटूंबाला 10 हजार रुपयांची मदत

गोरेगाव, 
Assistance to the affected family तालुक्यातील कलपाथरी येथे शनिवारी 7 जून रोजी रात्री अचानक लागलेल्या आगीमुळे तीन कुटुंबावर मोठे संकट आढोवले आहे. विद्युत शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत घरातील जीवनावश्यक साहित्य, धान्य, कपडे तसेच विविध घरगुती वस्तूंचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने संबंधित कुटुंब आर्थिक व मानसिक अडचणीत सापडले आहे. घटनेची माहिती मिळताच भाजपा युवा मोर्चा गोरेगावच्या वतीने या पिडीत कुटूंबीयांची भेट घेऊन त्यांना मदतीचा आधार देण्यात आला.
 
 
madad
 
कलपाथरी येथील दिलीप गजानन हेमने, सुनील गजानन हेमने आणि राजकुमार गजानन हेमने यांच्या घराला शनिवारी रात्री 8 वाजताच्या सुमारास अचानक शॉर्टसर्किट होऊन आग लागली. या आगीत घरातील अन्नधान्यासह जीवनोपयोगी साहित्य जळून खाक झाले. या दुर्घटनेची माहिती मिळताच भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे पदाधिकारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पीडित कुटुंबाची भेट घेऊन नुकसानीची पाहणी केली तसेच त्यांना धीर देत मदतीचा हात दिला. भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष रोहित अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली युवा मोर्चाच्या शिष्टमंडळाने पीडित कुटुंबाला तातडीची आर्थिक मदत म्हणून 10 हजार रुपयांची रक्कम सुपूर्द केली. संकटाच्या काळात समाजाप्रती असलेली बांधिलकी जपत युवा मोर्चाने दाखविलेल्या या संवेदनशीलतेचे परिसरात कौतुक होत आहे. यावेळी युवा मोर्चाचे जिल्हा महामंत्री मनोज बोपचे, तालुका अध्यक्ष रवि पटले, तालुका महामंत्री काका पारधी, जिल्हा उपाध्यक्ष बंटी गौतम, भाजपा माजी तालुका अध्यक्ष संजय बरेवार, मुकेश खरोले, सरपंच तसेच पक्षाचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. प्रसंगी उपस्थित पदाधिकार्‍यांनी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा हा केवळ राजकीय संघटनात्मक कार्यापुरता मर्यादित नसून समाजातील प्रत्येक सुख-दुःखात सहभागी होणारा परिवार आहे. नैसर्गिक आपत्ती, अपघात किंवा अन्य कोणत्याही संकटाच्या प्रसंगी गरजू नागरिकांच्या मदतीसाठी संघटनेचे कार्यकर्ते नेहमीच तत्पर राहत असल्याचे सांगितले.