५ जणांना पॉक्सो अंतर्गत अटक
भंडारा:
Blackmail case जिल्ह्यातील गोबरवाही परिसरात अल्पवयीन मुलीचा खासगी व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल करून तिला ब्लॅकमेल केल्याची धक्कादायक प्रकार उघडकीस आली आहे. या प्रकरणात पोलिसांनी तत्काळ कारवाई करीत मुख्य आरोपीसह पाच जणांना अटक केली असून त्यामध्ये दोन अल्पवयीन मुलांचा समावेश आहे.
उघडकीस आलेल्या या प्रकरणामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. एका अल्पवयीन मैत्रिणी सोबत शरीर संबंध ठेवत, आक्षेपार्ह परिस्थितीतील व्हिडिओ तयार करून तो समाज माध्यमांवर टाकण्यात आला. मुलीचे हे चित्रीकरण गुप्तपणे तयार केले आणि त्याचा वापर करुन तिच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. या व्हिडिओच्या आधारे मुलीवर मानसिक दबाव आणत तिला धमकावण्यात आले आणि तिला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न झाल्याचे समोर आले आहे. मुलीने त्यांच्या दबावाला प्रतिसाद न दिल्याने आरोपींनी तोच व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल केला.
Blackmail case या घटनेनंतर पिडीतेच्या आईने गोबरवाही पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी तातडीने तपास सुरू करत पाचही आरोपींना ताब्यात घेतले आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये भावेश यादव १९, क्षितिज पटले १९, बाल्या उर्फ करण चौधरी २१ तसेच दोन अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. या प्रकरणी पोलिसांनी भारतीय न्याय संहिता अंतर्गत विविध गंभीर कलमांसह पॉक्सो कायदा आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. अल्पवयीन मुलीच्या सुरक्षिततेला धक्का देणारा हा प्रकार अत्यंत गंभीर असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले असून पुढील तपास सुरू आहे.