आर्णी,
arni-news : छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व शिबिर अभियान टप्पा 1 अंतर्गत महसुल विभागाच्या तहसील कार्यालयाच्या वतीने सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, विद्यार्थी व महिला यांच्या दैनंदिन प्रश्नांचे निराकरण, नागरिकांच्या तक्रारी तात्काळ निकाली काढणे, विविध योजनाचे प्रमाणपत्राचे वाटप, योजनांचा लाभ प्रदान करण्यासाठी माहेर मंगल कार्यालय येथे शिबीर घेण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष तहसीलदार वैशाख वाहुरवाघ होते. प्रमुख पाहुणे माजी आमदार ख्वाजा बेग, प्रिया तोडसाम (शिंदे), नप अध्यक्ष नालंदा भरणे, माजी नगराध्यक्ष आरीज बेग, नप मुख्याधिकारी रवींद्र राऊत, भूमी अभिलेख अधिकारी रमेश हेमके, तालुका कृषी अधिकारी आनंद बदकल, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. आरती नाटकर, पशूसंवर्धन अधिकारी डॉ. मेहर, डॉ. नाहीद बेग, संगीता रावते, अतुल देशमुख, बिपीन राठोड, किसन राठोड, संजय व्यवहारे, राजू बुटले, परशराम राठोड होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक नायब तहसीलदार उदय तुंडलवार यांनी केले. नंतर मान्यवरांचे मार्गदर्शन झाले. अध्यक्षीय मनोगत तहसीलदार वैशाख वाहुरवाघ म्हणाले, प्रशासनात काम करत असताना अनेक अडचणी येतात. त्यामुळे प्रत्येकाच्या मनासारखे काम करता येत नाही. कायद्याच्या चौकटीत राहून काम करावे लागते. सर्वाचे काम व्हावे यासाठी आम्ही काम करत असतो. सरकारी योजना जनतेपर्यंत पोहचुन त्याचा लाभ मिळावा. योजनेची योग्य अंमलबजावणी करणे हेच आमचे काम आहे.
मान्यवरांच्या हस्ते विविध योजनांचा 1 हजार 950 लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला. यात प्रमाणपत्र कार्ड, सातबारा दुरूस्तीचे प्रमाणपत्र, वारस नोंदीचे प्रमाणपत्र, जमिनीचे वर्ग 1 मध्ये रुपांतर डिजिटल सातबारा, महसूल संबंधित प्रकरणाचे प्रमाणपत्र रहिवासी प्रमाणपत्र, नाँनक्रिमीलेअर प्रमाणपत्र, सामाजिक न्याय विभाग योजनाचे घरपट्टे वाटप, दिव्यांग निधी वाटप, शालेय विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र, महसूल, आरोग्य विभाग, ग्रामविकास, कृषी विभाग, सेतू सुविधा, आधार केंद्र या विभागांमार्फत लाभ देण्यात आला.
कार्यक्रमाचे संचालन मंगेश तोरडे यांनी केले. यावेळी नायब तहसीलदार डॉ. संतोष अदमुलवाड, नायब तहसीलदार प्रमोद गुल्हाने, पुरवठा निरीक्षक अधिकारी जीवन राठोड, पुरवठा निरीक्षक अधिकारी सचिन बिन्नोड, मंडळ अधिकारी राजेश नागलकर, आशिष पांचोरे, ग्राममहसूल अधिकारी ममता पवार, मीनाक्षी उसरे, भारती कुथे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाला नगरसेवक, महसूल अधिकारी, मंडळ अधिकारी, ग्राममहसूल अधिकारी, नप कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.