नागपूर,
Amar Jawan Memorial premises नागपूर महानगरपालिका आणि दैनिक तरुण भारत यांच्या स्वच्छता उपक्रमांतर्गत अजनी चौक, वर्धा रोड येथील अमर जवान स्मारक परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या उपक्रमात माजी वायुसैनिक कल्याण संघटना (इवान)च्या पदाधिकारी व सदस्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
सन २०११ पासून कार्यरत असलेली इवान संघटना वर्षभर विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन करत असते. माजी सैनिकांच्या पुढाकारातून २०१६ मध्ये उभारण्यात आलेले अमर जवान स्मारक हे माजी सैनिकांसाठी श्रद्धास्थान आणि प्रेरणास्थळ मानले जाते. या स्मारकाचे पालकत्वही इवान संघटनेकडे सोपविण्यात आले आहे.
स्वच्छता अभियानादरम्यान ब्रिगेडियर सुनील गावपांडे, राजू धांडे, महेश आंबोकर, अजय गाढवे, गुरुदत्त खातखेडे, सुभाष भुसारी, ओमप्रकाश शिरपूरकर, चंद्रशेखर कुलकर्णी, श्रीकांत गंगाथडे, भांडारकर, जयस्वाल, विलास अहेर, रविकांत नारखेडे, सुधाकर सारवे, पुंडलिक सावंत, प्रमोद माकोडे, सचिन खेडीकर आणि विवेक समर्थ यांनी प्रत्यक्ष श्रमदान करून परिसर स्वच्छ केला. उपस्थितांनी स्मारक परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्याचा संकल्पही यावेळी व्यक्त केला.