हिमालयाच्या कुशीतून विस्तारल्या कक्षा

जगातील सर्वात लांब दुतर्फा झोजिला बोगद्याचे काम पूर्णत्वास

    दिनांक :09-Jun-2026
Total Views |
जम्मू
zojila Tunnel gadkari केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या साक्षीने आज जगातील सर्वात लांब दुतर्फा झोजिला बोगद्याचे काम पूर्णत्वास गेले. या निमित्ताने आयोजित एका प्रतिकात्मक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. यात बोगद्याच्या शेवटच्या खडकाच्या भिंतीचं उत्खनन करून एक प्रतिकात्मक पूर्णत्व सोहळा पार पडला. या सामरिकदृष्ट्या महत्त्वाच्या बोगद्यामुळे काश्मीर आणि लडाखला बारमाही कनेक्टिव्हिटी मिळणार आहे.
 
gadkari news 
 
zojila Tunnel gadkari जम्मू-काश्मीरच्या सोनमर्गला भेट द्यायला आलेल्या एका पर्यटकाने झोजिला बोगद्याच्या कामाचे कौतुक केले आहे. अशा पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांमुळे प्रवास खूप सोपा होईल आणि पर्यटनालाही चालना मिळेल, असं त्यांचं म्हणणं आहे. हा दुतर्फा बोगदा पूर्ण झाल्यावर लडाखला पोहोचणं सोपं होईल आणि प्रादेशिक कनेक्टिव्हिटी वाढेल, असा विश्वास या पर्यटकाने व्यक्त केला.
zojila Tunnel gadkari या पर्यटकाने सांगितले की, झोजिला पास ओलांडून लडाखला जाणं खूप अवघड होतं आणि आम्हाला अनेकदा मध्येच थांबावं लागायचं... अशा ठिकाणी बोगदे झाल्यामुळे प्रवास सोपा होतोय आणि पर्यटनालाही गती मिळतेय... हा बोगदा पूर्ण झाला, तर श्रीनगर ते लेह मार्गावरचा तो एक मोठा मैलाचा दगड ठरेल. संरक्षणाच्या दृष्टिकोनातूनही ही एक महत्त्वाची कनेक्टिव्हिटी आहे... आमच्यासाठी लडाखला पोहोचणं आणखी सोपं होईल.
zojila Tunnel gadkari भारतीय पायाभूत सुविधांमधील एक मैलाचा दगड
13.153 किलोमीटर लांबीचा झोजिला बोगदा हा जगातील सर्वात लांब सिंगल-ट्यूब, दुतर्फा वाहतुकीचा बोगदा आहे. याचं अंतिम काम पूर्ण होणं हा भारताच्या पायाभूत सुविधांच्या विकासातील एक ऐतिहासिक टप्पा असेल.

zojila Tunnel gadkari सामरिक स्थान आणि खर्च
जम्मू-काश्मीर आणि लडाख या केंद्रशासित प्रदेशांमधील बालताल (सोनमर्ग) आणि मीनामार्ग (द्रास आणि कारगिल) दरम्यानच्या झोजिला भागात हा बोगदा आहे. हिमालयातील या सर्वात आव्हानात्मक मार्गावर बारमाही कनेक्टिव्हिटी देणं हा या प्रकल्पाचा उद्देश आहे. हा भाग दरवर्षी प्रचंड बर्फवृष्टी, हिमस्खलन आणि खराब हवामानामुळे अनेक महिने बंद असतो. सुमारे 11,578 फूट उंचीवर असलेला हा बोगदा 6,500 कोटी रुपये खर्चून बांधला जात आहे. या प्रकल्पाची डेव्हलपर कंपनी मेघा इंजिनिअरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर्स लिमिटेडच्या मते, हा बोगदा म्हणजे भारताच्या पायाभूत सुविधा क्षेत्रातील एक मोठं अभियांत्रिकी यश आहे.