नागपूर,
Deepika and Ranveers new home बॉलिवूडमधील लोकप्रिय जोडी दीपिका पादुकोण आणि दीपिका पादुकोण सध्या त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील आनंददायी टप्प्याचा अनुभव घेत आहेत. दीपिकाच्या दुसऱ्या गरोदरपणामुळे दोघांच्याही आयुष्यात उत्साहाचे वातावरण असून अलीकडेच हे दोघे त्यांच्या नव्या घराच्या ठिकाणी पाहायला मिळाले. मुंबईतील बांधकाम सुरू असलेल्या त्यांच्या नव्या आलिशान घराची पाहणी करण्यासाठी हे कपल एकत्र आले होते. घराचे बहुतांश काम पूर्णत्वाकडे जात असल्याचे दिसून येत असून अंतर्गत सजावटीचे काम अद्याप सुरू आहे. लवकरच हे दोघे या नव्या घरात स्थलांतर करणार असल्याची चर्चा आहे.

या भेटीदरम्यान दोघांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे. बाल्कनीमध्ये उभे राहून दोघे घराची पाहणी करताना आणि गप्पा मारताना दिसले. या व्हिडिओमध्ये दीपिकाचा बेबी बंप स्पष्ट दिसत असल्याने चाहत्यांचे लक्ष तिच्याकडे अधिकच वेधले गेले. दीपिकाने यावेळी साध्या आणि पांढऱ्या रंगाच्या पोशाखात आपला लूक ठेवला होता, तर रणवीरने लाल टी-शर्ट आणि काळ्या पँटमध्ये कॅज्युअल स्टाईल स्वीकारली होती. दोघांच्या या साध्या पण आनंदी क्षणांना चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात पसंती दिली आहे.
काही दिवसांपूर्वीच या जोडप्याने दीपिका पुन्हा गरोदर असल्याची अधिकृत घोषणा केली होती. त्यानंतर त्यांच्या कुटुंबात आनंदाचे वातावरण अधिकच वाढले आहे. याआधी त्यांनी त्यांच्या मुलगी दुआचा एक खास फोटो शेअर करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली होती, ज्यामुळे सोशल मीडियावर अभिनंदनाचा वर्षाव झाला होता. दरम्यान, दीपिकाने अलीकडील एका मुलाखतीत तिच्या पहिल्या गरोदरपणातील अनुभवांबद्दल बोलताना तो काळ थोडा कठीण होता असे सांगितले होते. प्रसूतीदरम्यान आलेल्या अडचणींचाही तिने उल्लेख केला होता, मात्र मातृत्वाचा अनुभव तिच्यासाठी अत्यंत खास असल्याचेही तिने स्पष्ट केले.
कामाच्या आघाडीवर बोलायचे झाल्यास, दीपिका लवकरच राका या चित्रपटात अल्लू अर्जुन सोबत दिसणार आहे. तर रणवीर सिंगच्या आगामी प्रोजेक्ट्समध्ये धुरंधर आणि त्याचा सिक्वेल यांचा समावेश असल्याची चर्चा आहे. दोघेही सध्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यातील महत्त्वाच्या टप्प्यावर आहेत.